साकोरा : नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव जिल्हा परिषद केंद्रांतर्गत शिक्षण परिषद इंदिरानगर तळवाडे शाळेत संपन्न झाली. या वेळेस सरपंच नामदेव सोनवणे, उपसरपंच सुनिल उगले, सदस्य प्रभाकर माळी यांनी शाळेस संगणक संच तसेच उपसरपंच सुनिल उगले यांनी संगणक टेबल भेट दिला.अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख श्रीमती घुगे होत्या. यशोगाथा ह्या नियोजित परिपत्रकाच्या वेळेत येवला तालुक्यातील महालखेडा येथील उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश्वर पायमोडे यांनी ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ व विद्यार्थी सहकारी बॅँक या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी मुख्याध्यापिका कल्पना बच्छाव, संभाजी घुगे, पुष्पा चव्हाण, बजरंग मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. महेश थोरे यांनी स्वागत तर आभार प्रदर्शन सागर सोळुंके यांनी केले.
तळवाडे ग्रामपंचायततर्फे जिप शाळेस संगणक भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 6:39 PM
साकोरा : नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव जिल्हा परिषद केंद्रांतर्गत शिक्षण परिषद इंदिरानगर तळवाडे शाळेत संपन्न झाली. या वेळेस सरपंच नामदेव सोनवणे, उपसरपंच सुनिल उगले, सदस्य प्रभाकर माळी यांनी शाळेस संगणक संच तसेच उपसरपंच सुनिल उगले यांनी संगणक टेबल भेट दिला.
ठळक मुद्दे ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ व विद्यार्थी सहकारी बॅँक या विषयावर मार्गदर्शन