शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

कॉन्सन्ट्रेटर मशीनद्वारे केली रुग्णांच्या ऑक्सिजनची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:16 AM

सिन्नर : रोटरी क्लब, गोंदेश्वरच्या सदस्यांनी स्वखर्चातून तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन विकत घेतली आहेत. तालुक्यातील ज्या कोविड रुग्णांना ऑक्सिजनची ...

सिन्नर : रोटरी क्लब, गोंदेश्वरच्या सदस्यांनी स्वखर्चातून तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन विकत घेतली आहेत. तालुक्यातील ज्या कोविड रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, त्या बाधित रुग्णांना कुठलीही फी न घेता ही मशीन वापरण्यासाठी उपलब्ध करून दिल्याने ती गरजू रुग्णांना वरदान ठरत आहेत.

एक महिन्यापासून ही सेवा क्लबच्या माध्यमातून अविरत सुरु आहे. अनेक रुग्णांनी क्लबचे आभार मानले आहेत. एक महिन्यापूर्वी ज्यावेळेस रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत होती, त्यावेळेस क्लबच्या सदस्यांनी एकत्र येऊन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. आज तीनही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन रुग्णांच्या सेवेत आहेत. या उपक्रमाबद्दल क्लबचे अध्यक्ष महेश बोर्‍हाडे, सचिव अनिल गोर्डे व सर्व सदस्यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे. अनेक रुग्ण व नातेवाईकांनीही त्यांचे आभार मानले आहेत. तालुक्यातील रुग्णांना ऑक्सिजन मशीन हवी असल्यास क्लबचे अध्यक्ष महेश बोर्‍हाडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इन्फो...

स्वखर्चातून मशीन रुग्णांसाठी उपलब्ध

अनेक ठिकाणी क्लबतर्फे औषधे, मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट दिले. पण ज्यावेळेस ऑक्सिजन मिळत नाही म्हणून रुग्ण दगावतात, असे समजल्यावर लगेचच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन विकत घेऊन ती रुग्णांना वापरण्यास देण्याचे ठरवले. तीन मशीनसाठी जवळपास १ लाख ७५ हजार रुपयांची गरज होती. सामाजिक कामात तत्पर असलेल्या सर्व सदस्यांनी लगेचच ही रक्कम स्वतःच्या खिशातून क्लबला उपलब्ध करुन दिली.

फोटो ओळी- २४ सिन्नर रोटरी

सिन्‍नर येथे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनसमवेत रोटरी क्लब, गोंदेश्वरचे अध्यक्ष महेश बोर्‍हाडे व पदाधिकारी.

===Photopath===

240521\24nsk_39_24052021_13.jpg

===Caption===

सिन्‍नर येथे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनसमवेत रोटरी क्लब गोंदेश्वरचे अध्यक्ष महेश बोर्‍हाडे व पदाधिकारी.