खमताणे : महिन्याभरात भाजीपाल्याची मोठी आवक झाल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे त्यामुळे उत्पादकाना मोठा आर्थिक फटका बसत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत.मेथी १० रूपयांना ३ जुड्या अशी विक्री होत आहे. साधारणत: आॅक्टोबर महिन्यापासुन तालुक्यातील खमताणेसह मोसम पट्यात बहूंताश भागात लागवड केली जाते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात भाजीपाला बाजारात येतो. यामुळे भाजीपाल्यांचे दर हळूहळू कमी होत जातात. मात्र दुष्काळाची दाहकता दिससेंदिवस वाढतच असल्याने शेतकऱ्यांच्या दु:खात भर पडत आहे.पाण्याची वानवा, शेतकरी कोथंबीर, मेथी, गाजर, मुळा, पालक शेपू आदी पिके घेत आहेत. महिनाभरातच भाजीपाला काढणीला येतो. या वर्षी पाण्याची कमतरता भासत आहे. त्यातच कुठल्याच मालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतशिवार लवकरच मोकळी झाली आहे.इतर वर्षीपेक्षा यंदा भाजीपाल्याची मोठी आवक झाली आहे. शेतकरी भल्या पहाटेपासुन रात्री उशिरापर्यत भाजीपाला विकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्याचा दर कोसळल्याचे दिसते. शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला बाजारपेठेत घेऊन जातो. परंतू सध्या दर घसरलेले असतानाही काहीजण घासाघीस करून उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करतात. भाजीपाला लागवड केली असुन, सध्या दर पडले असल्याने भाजीपाला कवडीमोल दराने विकावा लागत आहे.- अमीत बागुल, शेतकरी.
भाजीपाल्याचे दर कोसळल्याने चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 7:45 PM
खमताणे : महिन्याभरात भाजीपाल्याची मोठी आवक झाल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे त्यामुळे उत्पादकाना मोठा आर्थिक फटका बसत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत.
ठळक मुद्देखमताणे : आवक वाढल्याचा परिणाम? शेतकरी हवालदिल