वणी : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला असुन थंडीमुळे तापमान घसरल्याने द्राक्ष उत्पादकांची चलबिचल झाली आहे. दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासुन थंडीत वाढ झाली आहे.सद्यस्थितीतील हे वातावरण द्राक्ष बागांसाठी प्रतिकुल व मारक असेच आहे. सध्या द्राक्षबागातील बहरलेली द्राक्षे खरेदी करण्याची लगबग परप्रांतीय व्यापाऱ्याची सुरु आहे मात्र अशा वातावरणामुळे व्यापारी वर्गाने द्राक्ष खरेदी करण्याची गती कमी केली आहे. कारण काही दिवसांपुर्वी हरियाणा पंजाब दिल्ली नोईडा या भागात पावसाने हजेरी लावली होती सदर राज्यात तेव्हा मागणी नसल्याने द्राक्षबागांकडे व्यापारी वर्ग फिरकलाही नाही. मागील आठवडा भरात थंडिचा प्रभाव कमी झाला होता. तेव्हा द्राक्ष खरेदी विक्र ी प्रक्रि या सुलभ होइल असे वाटत होते, आता मात्र पुन्हा थंडीचे प्रमाण वाढले आहे. मकर संक्रातीनंतर थंडीचे प्रमाण कमी होते असे नैसर्गिक गणित मात्र त्याला छेद देत प्रतिकुल वातावरण निर्माण झाल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. अगोदरच द्राक्षाला कमी दर मिळत असताना उत्पादक चिंतातुर झाले होते व आता थंडी यामुळे उत्पादक दुहेरी कोंडीत सापडले आहेत.