ेलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भिन्न भिन्न समिकरणांच्या आधारे निवडणुका लढल्या जात असल्या तरी लोकसभेचा लागलेला निकाल विधानसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेवर दूरगामी परिणाम करणारा आहे. सर्वच राजकीय पक्षांना धडा शिकवणारा असलेला निकाल माजी आमदारांच्या संबंधित पक्षांकडील संभाव्य उमेदवाऱ्या, जातीय समिकरणांचा परिणाम, दुखावलेली मने आदींमुळे आगामी विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे.काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर सलग दोनवेळा निर्मला गावित यांना ह्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायला मिळाले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेली मते गावित यांचा हुरुप वाढविणारी असली तरी शिवसेनेची मुसंडी चिंतेत भर टाकणारी ठरली आहे. तर हेमंत गोडसे यांनी मतदार संघात मिळवलेली मते आमच्यामुळे मिळू शकली असा समज झालेले विधानसभा निवडणुकीतील संभाव्य उमेदवार करीत आहेत. शिवसेनेचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या सौभाग्यवती शिरसाठे जिल्हा परिषद गटाच्या सदस्य आहेत. त्यांच्या गटातील मिळालेली मते पाहता त्यांची अपेक्षित कामगिरी समाधान देणारी नाही. आदिवासी ठाकूर समाजावर त्यांची पकड असल्याचा त्यांचा दावा असला तरी नांदगाव सदो गटात मात्र जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे यांची कामिगरी बरी म्हणावी लागेल. दोघांच्या स्पर्धात्मक कामांमुळे किती मतदान शिवसेनेनेला वाढले ह्याचा जिल्हा पदाधिकारी नक्कीच चिंतनीय अभ्यास करतील. मुळात इगतपुरीची जागा शिवसेनेला सोडली जाते. ह्या जागेवर मेंगाळ यांचा दावा असला तरी कोरी पाटी म्हणून कावजी ठाकरे यांना संधी द्यावी असा मतप्रवाह शिवसैनिकात लोकसभा निकालामुळे वाढला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्यामुळे गोडसे विजयी होऊ शकले असा मतप्रवाह निकालानंतर वाढतो आहे. अर्थातच ही जागा भाजपला सोडावी आणि शिवराम झोले यांना तिकीट मिळावे यासाठी निकाल लागल्यानंतर हालचाली जाणवू लागल्या आहेत. ह्या दोघांच्या शर्यतीत पर्याय म्हणून हरसूल गटासह त्र्यंबकेश्वर तालुक्यात आघाडी देणारे विनायक माळेकर यांना मैदानात उतरवण्यासाठी निकाल दूरगामी परिणाम करणारा ठरण्याची शक्यता वाढली आहे. विविध राजकीय पक्षाचे जिल्हाभर मिरवणारे पदाधिकारी इगतपुरी तालुक्यात आहेत. वेळोवेळी हे पदाधिकारी सोशल मीडिया, छोटी आंदोलने आदींमुळे नेहमीच चर्चेत असतात. कोणत्याही उमेदवारांचे भवितव्य आम्ही घडवू शकतो हा त्यांचा आत्मविश्वास निकालाने कोसळवला आहे.कार्यकर्त्यांना चार्जिंग करणारा निकालगत विधानसभा निवडणुकीत चुरशीची लढत झाली होती. आता ज्या गावात भुजबळांना कमी मते मिळाली त्या गावांचा सूक्ष्म अभ्यास करून पोकळी भरून काढण्यासाठीच्या उपाययोजना सुरू झाल्या आहेत. नेमके हेच काम शिवसेना भाजप कार्यकर्तेही करत आहेत. ह्यामुळे विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी म्हणून निकालाचा परिणाम जाणवतो आहे. एकंदरीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे.
शिवसेनेचे मताधिक्य वाढल्याने कॉँग्रेसच्या गोटात चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 1:13 AM