नाशिक : येथे ‘नादचिंतन’ आणि ‘रंगसंगती’ यांच्या वतीने प्रथमच संत कबीर जयंतीचे आगळेवेगळे आयोजन करण्यात आले होते. ‘नादचिंतन’ प्रस्तुत ‘निर्गुण शून्य कबीरा’ या संत कबीरांच्या गूढ, अद्भुत तत्त्वचिंतनावर आधारित एक सहज सोपा गायन-संवाद आविष्कार यावेळी सादर करण्यात आला. सदर कार्यक्रमात शास्त्रीय संगीताचे गायक सचिन चंद्रात्रे तसेच त्यांचे शिष्य चिन्मय भार्गवे व चैतन्य भावे यांनी संत कबीरांच्या रचनांचे सादरीकरण केले. संवादिनीवर साथसंगत प्रसाद गोखले तर तबलासंगत सतीश पेंडसे यांनी उत्तमप्रकारे केली. कार्यक्रमासाठी प्रदीप पोळ, उपायुक्त, आदिवासी विकास विभाग, संदीप हेडाव, सहायक आयुक्त सेंट्रल एक्साइज नितीन रायरीकर, विशेष अधिकारी सेंट्रल एक्साइज, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. नानासाहेब खरे, प्रा. उमेश पठारे, वृत्तनिवेदिका प्रिया पाडळीकर आदी उपस्थित होते. निर्मिती सहाय्य भारत तेजाळे, महेंद्र गायकवाड, देवेंद्र उबाळे व प्रकाश दोंदे यांचे होते.
‘नादचिंतन’च्या वतीने मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:47 AM