मुखेड : येथील ग्रामदैवत श्री विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य पूर्णत्वास आले असून, यानिमित्त तीन दिवस अखंड कीर्तन, भजन तसेच विविध पूजापाठ करण्यात आले. मंदिराची नवीन वास्तू भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली होती. वारकरी सांप्रदायाचे दुसरे नाव म्हणजेसमानता, जाती-धर्म, श्रीमंत-गरीब सर्व भेदांना तिलांजली देऊन सर्वांभूती परमेश्वर या तत्त्वाने वारकरी समाज चालतो.श्री विठ्ठलाच्या या नवीन वास्तूत विविध जाती-धर्माच्या सुमारे २० संतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यानिमित्त विठ्ठल मंदिरास आकर्षक विद्युत दिव्यांची आरास करण्यात आली होती. २१ जोडप्यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वरच्या तर स्थानिक दोन अशा सात ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली पूजा करण्यात आली.पहिल्या मजल्यावर शॉपिंग सेंटर तर दुसऱ्या मजल्यावर श्री विठ्ठल-रुक्मिणी व संतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अशोक गुंड, रामराव आहेर, भास्कर आहेर, अशोक आहेर, सचिन आहेर, दिलीप आहेर, आप्पासाहेब गुरव, छगन आहेर, विलास आहेर, अनंत आहेर यांच्या अथक परिश्रमातून मंदिराची निर्मिती केली आहे. श्री विठ्ठल-रु क्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठेचा मान उद्योजक उत्तम शिंदे, जया शिंदे आणि इतर चार जोडप्यांना मिळाला.मंदिराची निर्मिती करताना गेल्या चार ते पाच वर्षांपासून सतत दुष्काळाशी झुंजणाºया ग्रामस्थांकडून वर्गणी मागणे संयुक्तिक ठरणार नाही. त्यामुळे पहिल्या मजल्यावर शॉपिंग सेंटरची निर्मिती करून एक कोटी रु पयांच्या मंदिराची निर्मिती केली आहे.
मुखेड येथे अखंड कीर्तन सोहळा रंगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 11:31 PM
ग्रामदैवत श्री विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य पूर्णत्वास आले असून, यानिमित्त तीन दिवस अखंड कीर्तन, भजन तसेच विविध पूजापाठ करण्यात आले. मंदिराची नवीन वास्तू भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली होती.
ठळक मुद्देएक कोटी रु पयांच्या मंदिराची निर्मिती