सातव्या दिवशी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण गावातून भागवत कथेची पूजा करण्यात आली. टाळमृदंगाच्या गजरात कोरोनानंतर पहिल्यांदाच नामाचा गजर करण्यात आला. तर आठव्या दिवशी तुकाराम बाबा मेहुणकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली. ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक यांनी प्रसादासाठी हजेरी लावली. माझी वसुंधरासाठी दाभाडी गावाची निवड झाली असून यावेळी स्वच्छता राखण्याची सर्वांनी शपथ घेतली. सार्वजनिक स्वच्छतेची शपथ ग्रामसेवक शिरोळे यांनी देत सर्वांना स्वच्छतेचा संदेश दिला.
जेएटी महाविद्यालयात सीबीसीएस पॅटर्न कार्यशाळा
मालेगाव : येथील जेएटी महाविद्यालयात द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सीबीसीएस पॅटर्न या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मो. हारुन मो. रमजान अन्सारी होते. प्रा. व्ही.के. पवार यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. डॉ. कनिज फातिमा लोधी यांनी सीबीसीएस पॅटर्नची शिक्षणातील उदारीकरण आणि जागतिकीकरणाबरोबर अभ्यासक्रमाची नव्याने व्याख्या करण्याची आणि कार्यक्रमाची उद्दिष्ट्ये सांगितली. पहिल्या सत्रात मसगा महाविद्यालयाचे सहायक सीईओ एल.के. निकम यांचे व्याख्यान झाले. दुसऱ्या सत्रात शहर महाविद्यालयातील डॉ. शाकेब अहमद मुमताज यांचे व्याख्यान झाले. तिसऱ्या सत्रात डॉ. सलमा सत्तार यांनी तर शेवटच्या सत्रात डॉ. कनिझ फातिमा लोधी यांचे व्याख्यान झाले. प्राचार्य डॉ. अन्सारी यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन फहमिदा मोहंमद हारुन अन्सारी यांनी केले.