साकोरा : गेल्या कित्येक वर्षांपासून लिक्विडेशनात (अवसायनात) गेलेली साकोरे नवे पांझण सोसायटी जमिनीवरील अतिक्रमण कायम करणेबाबत अनेकवेळा विनंतीअर्ज करूनही शासनाने कुठलीही दखल न घेतल्याने कालपासून साकोरा ग्रामस्थांनी नांदगाव तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू केले होते. समस्या सोडविण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.शेतकऱ्यांनीदेखील अनेकवेळा विनंती अर्ज, निवेदन देउनही शासन कुठलीही दखल घेत नसल्याने सर्व शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत. जिल्हाधिकारी जोपर्यंत याबाबत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाहीत. पुढील होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.उपोषणास भारत कदम, प्रकाश भावसार, माणिक हिरे, सतीश कदम, रमेश कदम, सुमनबाई कदम, सिंधूबाई सुर्वे, गयाबाई बोरसे, यशोदाबाई झोडगे, लक्ष्मीबाई मोरे, लक्ष्मीबाई पगारे, वसंत पगारे, मधुकर बराक, बाजीराव वाघ, पंडित निकम, भीमराव दैतकार, तुकाराम खैरनार असे एकूण नव्वद शेतकरी बसले असून, उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. (वार्ताहर)
नांदगावी उपोषणाची सांगता
By admin | Published: October 08, 2016 12:12 AM