नाशिक : अधिकाधिक चाचण्या करा, त्यातून संशयित, बाधितांचे लवकर ट्रेसिंग होईल. तसेच खासगी रुग्णालयांबाबत येत असलेल्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सर्व कोविड खासगी रुग्णालयांचे कॉँकरंट आॅडिट करा, असे निर्देश विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर फडणवीस यांनी हे आदेश दिले.बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयास फडणवीस यांनी भेट देऊन रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी करून काही मार्गदर्शक सूचना केल्या.रुग्णालयात रुग्ण येतात, तेव्हा त्यांची वैद्यकीय स्थिती तसेच त्यांचे प्रगतीचे अहवाल आणि रुग्णालयांकडून केली जाणारी दरआकारणी या सगळ्याचा कॉँकरंट आॅडिट रिपोर्ट तयार करण्याचे आदेशदेखील फडणवीस यांनी दिले.यावेळी त्यांच्यासमवेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, राहुल ढिकले, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जाया पाहणी दौºयात राजकीय आणि शासकीय सर्वोच्च दर्जाचे पदाधिकारी आणि अधिकारीच असताना यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.
खासगी रुग्णालयांचे कॉँकरंट आॅडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 12:59 AM
अधिकाधिक चाचण्या करा, त्यातून संशयित, बाधितांचे लवकर ट्रेसिंग होईल. तसेच खासगी रुग्णालयांबाबत येत असलेल्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सर्व कोविड खासगी रुग्णालयांचे कॉँकरंट आॅडिट करा, असे निर्देश विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर फडणवीस यांनी हे आदेश दिले.
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : जिल्हा प्रशासनाला दिले निर्देश