लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : अनुराधा चौकापासून जयभवानी रोड कॉर्नर, आर्टिलरी सेंटर रोड रस्ता दुभाजकांची दुरवस्था झाली असून, दुभाजकाच्या दोन्ही बाजूला झाडेझुडपे उगली आहेत. तसेच वाहनांच्या धुरामुळे व धुळीमुळे दुभाजक काळवंडून गेल्याने रात्रीच्या वेळेस दुभाजकांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे.भर लोकवस्तीतील व पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सदैव वर्दळ असलेल्या आर्टिलरी सेंटर रोडवर मनपा बांधकाम विभागाकडून रस्ता दुभाजक टाकण्यात आले. काही महिन्यांपूर्वीच रस्त्याच्या दुतर्फा असलेले जुने पथदीप काढून दुभाजकामध्ये नवीन एलईडी पथदीप बसविण्यात आले आहेत. त्यामुळे सायंकाळनंतर संपूर्ण आर्टिलरी सेंटर रोडवर प्रकाशाचा झगमगाट पसरलेला असतो. मात्र रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या फांद्या रस्त्याकडे मोठ्या प्रमाणात झुकल्याने काही ठिकाणी पथदीपाचा प्रकाश रस्त्यावर पडत नाही. दुभाजकाच्या दोन्ही बाजूला माती साचल्याने त्यामध्ये झाडेझुडपे उगली आहेत. तसेच वाहनांच्या धुरामुळे व धुळीमुळे दुभाजक काळवंडून गेले आहेत. त्यामुळे रात्री वाहनधारकांना दुभाजक व्यवस्थित दिसत नाही व अंदाजदेखील येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मनपा बांधकाम विभागाने या दुभाजकाची स्वच्छता करून झाडेझुडपे काढावेत अशी मागणी होत आहे.
आर्टिलरी रोडवरील दुभाजकाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 11:58 PM
नाशिकरोड : अनुराधा चौकापासून जयभवानी रोड कॉर्नर, आर्टिलरी सेंटर रोड रस्ता दुभाजकांची दुरवस्था झाली असून, दुभाजकाच्या दोन्ही बाजूला झाडेझुडपे उगली आहेत. तसेच वाहनांच्या धुरामुळे व धुळीमुळे दुभाजक काळवंडून गेल्याने रात्रीच्या वेळेस दुभाजकांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
ठळक मुद्देआर्टिलरी सेंटर रोडवर मनपा बांधकाम विभागाकडून रस्ता दुभाजक