शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

कळवणला जनजीवन विस्कळीत

By admin | Published: July 11, 2016 11:34 PM

अर्जुनसागर : लाभक्षेत्रात २४० मिमी, तर चणकापूरमध्ये १५२ मिमी पाऊस

 कळवण : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाला सुरुवात झाली असून, शनिवारी व रविवारी दिवसभर कळवण शहर व तालुक्याच्या आदिवासीसह ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या १२ तासात कळवण शहरात १५३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून, अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्प लाभक्षेत्रात २४० मिमी, तर चणकापूर प्रकल्प लाभक्षेत्रात १५२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तालुक्यातील जलप्रकल्पांच्या साठ्यात वाढ झाली आहे.पावसामुळे कळवण शहरातील व तालुक्यातील जनजीवन दोन दिवसांपासून विस्कळीत झाले आहे. शहरातील रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. शेतात तुडुंब पाणी भरल्याने अनेक बांध फुटले. त्यात शेतातील रोपे वाहून गेली. सप्तशृंगगडावर तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गडावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या आठवड्यात घाटात दरड कोसळली होती; परंतु सप्तशृंगगडाचे उपसरपंच राजेश गवळी यांनी रस्त्यावरील अडथळे दूर करून वाहतूक सुरळीत केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कळवण तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात गुरुवारी रात्रीपासून जोरदार पाऊस झाला. चणकापूरसह अर्जुनसागर धरणाच्या व नांदुरी, गोबापूर, मार्कंड पिंप्री, मळगाव, खिराड, मुळाणे, जामले, भेगू, धनोली आदि लघुपाटबंधारे प्रकल्पांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. कळवण, अभोणा, कनाशी, जयदर, सप्तशृंगगड, साकोरे, शिरसमणी, नवी बेज, ओतूर, नांदुरी, मोकभणगी, देसराणे, दळवट, खर्डे दिगर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने दोन दिवसांपासून तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. कळवण शहरातील विविध भागात व रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. कळवण शहरात सर्वत्र पाण्याचे तळे व डबके निर्माण झाले असून, गटारी तुडुंब भरल्या आहेत. पाण्याचा निचरा होत नसल्याने कळवण शहर जलमय झाले आहे. तीन-चार दिवसांपासून जोरदार पावसाने कळवण तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. तालुक्यातील आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागातील स्त्यांवरील अनेक छोटे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. जाण्या-येण्याचा मार्गच बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. (वार्ताहर)