शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

गंगापूरमधून पाणी देण्याबाबत संभ्रम

By admin | Published: December 02, 2015 10:45 PM

प्रशासन अनभिज्ञ : पाटबंधारे खात्याकडून मागविली माहिती

 नाशिक : गंगापूर व दारणा या धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडल्यानंतर निर्माण झालेला जनक्षोभ रोखण्यासाठी गंगापूर धरणाच्या डाव्या तट कालव्यातून नाशिक व निफाडच्या द्राक्षबागांसाठी तीन आवर्तने सोडण्याच्या पालकमंत्री तथा जलसंपदामंत्र्यांनी केलेल्या घोषणेबाबत खुद्द प्रशासनातच संभ्रम व्यक्त केला जात आहे. धरणातील पाण्यावर असलेले आरक्षण व प्रत्यक्ष साठा याचा कोणताही ताळमेळ बसत नसताना सिंचनासाठी तीन आवर्तने कसे सोडणार, अशी विचारणा प्रशासनाने पाटबंधारे खात्याकडे केली आहे. २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या जिल्ह्यातील पाणी आरक्षण बैठकीवर शेतकऱ्यांनी हल्लाबोल करून पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धारेवर धरल्यानंतर पाणी आरक्षणाचे फेरविचार करण्याचे ठरविण्यात आले व त्यानंतर दोन दिवसांनी मुंबईत झालेल्या बैठकीत गिरीश महाजन यांनी गंगापूर धरण समूहातून डाव्या तट कालव्यातून तीन आवर्तने द्राक्षबागांसाठी सोडण्याचे जाहीर केले, त्याच्या मोबदल्यात नाशिककरांसाठी दारणा धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्याचे आदेश पाटबंधारे खात्याला दिले होते. प्रत्यक्षात गंगापूर धरण समूहात ४१४१ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असून, महापालिका, एकलहरे, औद्योगिक वसाहत, मेरीसह पाणीपुरवठा योजनांसाठी ४९४६ दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी आहे. म्हणजेच शिल्लक पाण्यापेक्षा मागणीच अधिक असून, त्यात पाटबंधारे खात्याने कपात सुचविलेली आहे. त्याचाच परिणाम म्हणून नाशिक महापालिकेला मागणीपेक्षाही कमी पाणी देण्यात आल्याने पाणीपुरवठ्यात कपात करावी लागली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या द्राक्षबागांसाठी तीन आवर्तने सोडण्याच्या घोषणेची पूर्तता कशी होणार, असा प्रश्न प्रशासनातील अधिकारी विचारू लागले आहेत. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांनी केलेल्या घोषणेला दोन आठवडे उलटून गेले असून, मुंबईत लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची कोणतीही माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे अखेर पाटबंधारे खात्यालाच प्रशासनाने पत्र पाठवून धरणातील पाण्याची परिस्थिती व सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबतची माहिती सादर करण्याची सूचना केली आहे. (प्रतिनिधी)