नाशिक : शहरासह जिल्हाभरातील महत्त्वाच्या आर्थिक बाजारपेठांसह विविध ठिकाणी दहा रुपयांच्या नाण्यासह सुरळीत व्यावहार सुरू असतानाही वेगवेगळ्या सोशल मीडियात या नाण्याविषयी चुकीची माहिती पसरविली जात असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु विविध बँकांचे अधिकाऱ्यांकडून दहा रुपयांचे नाण्यासह सर्व व्यावहार सुरळीत सुरू असल्याचे सांगीतले जात असल्याने सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
--
कोणत्याच नाण्यावर बंदी नाही
सध्या चलनात असलेल्या एक , दोन, पाच व दहा रुपयांपैकी कोणत्याही नाण्यावर बंदी नाही. सर्व नाणे व्यवहारात सुरळीत सुरू आहेत. परंतु दहा रुपयांच्या नाण्याविषयी समाज माध्यमांवर संभ्रम पसरविण्याचे काम सुरू असल्याचे मत व्यावसायिकांकडूनही व्यक्त होत आहे.
--
बँकांमध्येही नाण्यांची देवाण-घेवाण
-रिझर्व्ह बँकेकडून दहा रुपयांच्या नाण्याविषयी कोणतीही सूचना नाही.
-दहा रुपयांचे नाण्यांची बँक व इतर ठिकाणीही देवाण-घेवाण नियमित सुरू आहे.
----
सर्वच नाण्यांसह व्यवहारात सुरळीत
सोशल मीडियावर दहा रुपयांच्या नाण्याविषयी संभ्रम पसरविणाऱ्या पोस्ट फिरत असल्या तरी नाशिक शहर व जिल्ह्यात एक, दोन, पाच व दहा असे सर्व चलनातील नाण्यांची दैनंदिन आर्थिक व्यवहारांमध्ये देवाण-घेवाण सुरळीत सुरू आहे.
--
नाणे हाताळण्यास सोपे
दहा रुपयांच्या नाणे बाजारात कोणीही नाकारत नाही. भाजीवाले, किराणा दुकानदार यांच्या सर्व व्यवहारांमध्ये दुकानदारही नाणे स्वीकारतात. त्यामुळे दहा रुपयांचे नाणे घेण्यात अडचण काहीच नाही उलट छोट्या व्यवहार दहा रुपयांच्या नाण्याने करणे सोयीचे होते.
अश्विन कदम, ग्राहक
दहा रुपयांच्या नोटा वारंवार हाताळल्यामुळे लवकर खराब होतात. तुलनेत दहा रुपयांचे नाणे अधिक काळ टिकते, शिवाय हाताळणेही सोपे आहे. समाज माध्यमांवर विनाकरण या नाण्याविषयी अफवा पसरविल्या जातात. परंतु, सर्वसामान्यांना व्यवहार करता येत असल्याने अशा अफवांकडे फारशे कोणी लक्ष देत नाही.
शुभम पाटील, ग्राहक --
--
नाण्यावर कोणतीही बंदी नाही
दहा रुपयांच्या नाण्याविषयी रिझर्व्ह बँकेकडून कोणतीही सीचना प्राप्त झालेली नाही. दहा रुपयांचे व पाच रुपयाचे नाणे चलनात सुरळीत सुरू आहे. आर्थिक देवाण-घेवाणीत या नाण्यांचे मूल्य कायम आहे. ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
-सुभाष कौटे, मुख्य व्यावस्थापक, नाशिक जिल्हा अग्रणी बँक