नाशिक : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणीच्या मागणीसाठी १ ते १० जूनदरम्यान देशपातळीवर शेतकºयांचा संप पुकारण्याच्या राष्टÑीय किसान महासंघाच्या घोषणेमुळे शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, नाशिक जिल्ह्यात शेतकºयांचा संप होईलच, असा दावा राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाने केली आहे तर नाशिकच्या शेतकरी सुकाणू समितीने संपात सहभागी न होण्याचे जाहीर केले आहे त्यामुळे संपाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.गेल्या वर्षी १ जून रोजीच राज्यातील शेतकरी संपावर गेले होते व त्याची दखल सरकारला घ्यावी लागली होती. या संपकाळात शेतकºयांनी शेतमाल विक्रीसाठी आणण्यास नकार दिला तर दूध उत्पादकांनी रस्त्यावर ओतून देत सरकारचा निषेध केला होता. नंतरच्या काळात मात्र नाशिक हेच आंदोलनाचे केंद्रबिंदू झाले होते. किसान महासंघाने पुन्हा संपाची हाक दिली आहे. तथापि, जिल्ह्यातील समितीने संपात सहभागी न होण्याची भूमिका घेत शहीद शेतकºयांना १ जून रोजी अभिवादन करण्याचे ठरविले आहे.तर राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे शंकर दरेकर यांनी जिल्ह्णात शेतकºयांचा संप होणार असल्याचे जाहीर करून त्यासाठी गनिमी काव्याचा वापर करण्यात येणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणणार नाही तसेच दूध उत्पादकही शहराला दूध पुरवठा करणार नसून, हे आंदोलन शेतकरी पुत्रच हाताळतील, असेही दरेकर यांनी सांगितले.
आजच्या शेतकरी संपाबाबत संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 1:17 AM