नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजूची दुकाने सम-विषम तारखेला सुरू ठेवण्याबाबत मनपा व पोलीस प्रशासनाकडून नियोजनपूर्वक आणि एकत्रित स्पष्ट सुचना न मिळाल्याने व्यापाऱ्यांचा गोंधळ उडाला असून व्यापाऱ्यांमध्ये सम व विषम तारखेमुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी पाच वाजता अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आस्थापना बंद करण्याचा राज्य शासनाचा आदेश आहे. मात्र राज्य शासनाकडून सर्व व्यवहार सुरळीत व सुरक्षित सुरू ठेवण्यासाठी रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजूची दुकाने सम व विषम तारखेला सुरू ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच रात्री नऊपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मनपा प्रशासनाकडून नाशिकरोड परिसरात काही भागात फिरून तेथील व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने कधी सुरू राहणार व कधी बंद राहणार याबाबत सांगण्यात आले. तर काही ठिकाणी पोलिसांनी दुकाने बंद करण्यास सांगितले. मनपा व पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या व्यापाऱ्यांना माहिती न दिल्याने गोंधळ व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच रात्री नऊ वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्यास परवानगी असतानासुद्धा पोलिसांकडून सायंकाळी पाच वाजताच दुकाने बंद करायला लावली. त्यामुळे शासनासह जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांरकडून करण्यात येणाऱ्या घोषणांची स्थानिक यंत्रणा योग्य रित्या अंमलबजावणी करीत नसल्याचे चित्र निर्माण झाले असून व्यापारी वर्ग बुचकळ्यात पडला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून नियोजनपूर्वक व्यापाऱ्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी केली जात आहे.
दुकाने सुरू ठेवण्याच्या सम व विषम तारखांमुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 1:13 PM
मनपा प्रशासनाकडून नाशिकरोड परिसरात काही भागात फिरून तेथील व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने कधी सुरू राहणार व कधी बंद राहणार याबाबत सांगण्यात आले. तर काही ठिकाणी पोलिसांनी दुकाने बंद करण्यास सांगितले. मनपा व पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या व्यापाऱ्यांना माहिती न दिल्याने गोंधळ व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे
ठळक मुद्देदुकाने सुरु ठेवण्याच्या वेळेबाबत संभ्रम यंत्रणेत समन्वय नसल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप