गणेश शेवरे, पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक): येथील बाजार समितीच्या निकालाच्या दिवशी निवडणुकीला गालबोट लागला असून यामुळे पिंपळगाव बाजार समिती परिसरात तणावाची वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाल्यापासून मोठा राजकीय संघर्ष निर्माण झाला होता. त्यातच या निवडणुकीतच हंगामी विधानसभा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीचे रंग दिसू लागले होते. त्यामुळे माघारी पासूनच या निवडणुकीला गालबोट लागण्याचे चित्र निर्माण झाले आणि अखेर निकालाच्या दिवशी त्यात विघ्न पडून अपक्ष उमेदवार यतीन कदम व माजी आमदार अनिल कदम यांच्यात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला.
तणावाचे रूपांतर बाचाबाचीत झाले, नंतर हाणामारी झाली. त्यामुळे पिंपळगाव बाजार समितीच्या परिसरात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. दोन्ही पॅनलच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्याने पोलिसांची तारांबळ उडाली आहे. निकालाचा दिवशीच बाजार समितीच्या प्रांगणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.