शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

वाटाघाटी उपसमितीसमोरच गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:57 AM

एसटी वेतनप्रश्न : आरोप-प्रत्यारोप, घोषणाबाजीने तणाव; तत्काळ पोलीस बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कामगार करारासाठी स्थापन करण्यात आलेल्या वाटाघाटी समितीने नाशिकमध्ये कामगारांची भूमिका जाणून घेण्याचा गुरुवारी प्रयत्न केला असता त्यांच्या समोरच कामगारांनी प्रचंड गोंधळ घालत घोषणाबाजी केल्याने अवघ्या सात ते आठ मिनिटांतच समितीला काढता पाय घ्यावा लागला. या प्रकारामध्ये दोन संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सदर प्रकारानंतर विभागीय कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांचा वेतन करार संपुष्टात येऊन सोळा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. परंतु अद्यापही कामगारांच्या वेतनाचा प्रश्न मिटलेला नाही. अधिकृत एस.टी. कामगार संघटनेने सातव्या वेतन आयोगाची मागणी केली आहे, तर उर्वरित १३ संघटनांनी कामगार करार करण्यात यावा, अशी भूमिका घेतलेली आहे. एस.टी. प्रशासनानेदेखील कराराची तयारी दर्शविली आहे. मात्र कामगार संघटना आयोगाच्या मुद्द्यावर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर एस.टी. प्रशासनाने नवीन कामगार करार करण्यासाठी आणि कामगारांची भूमिका ऐकून घेण्यासाठी वाटाघाटी समिती स्थापन केली आहे. या समितीचे मुख्य कामगार अधिकारी टी. एस. ढगे, महाव्यवस्थापक माधव काळे, वाहतूक अधिकारी मिलिंद बंड, गायधनी, पराडकर, रत्नपारखी यांच्या प्रमुख उपस्थितीत एन. डी. पटेल रोडवरील डेपोत समितीने बैठक आयोजित केली होती. मात्र या समितीसमोरच मोठा गोंधळ झाल्याने समितीला कामकाज आटोपते घ्यावे लागले. मुख्य कामगार अधिकारी ढगे यांनी प्रशासन करार करण्याच्या बाजूने असल्याचे सांगून अद्याप सातव्या वेतन आयोगाचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले. राज्यात कुणालाही अद्याप आयोग लागू झालेला नाही. त्यामुळे त्याबाबतचा मसुदा तयार करण्यास किती वेळ लागेल हे सांगणे कठीण असल्याने करार करण्याची प्रशासनाची तयारी असल्याचे सांगितले. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका मांडावी, असे आवाहन केले. त्यानंतर एस.टी. कामगार सेनेचे सुभाष जाधव हे आपली बाजू मांडत असतानाच एस.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय पवार यांनी आक्षेप घेत जाधव हे एका कामगार सेनेचे पदाधिकारी असून, या बैठकीत ते बोलू शकत नसल्याचा दावा केला. त्यानंतर कुणी बोलावे या मुद्द्यावरून वाद झाल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. समितीच्या व्यासपीठासमोरच कामगारांचा घोळका घोषणाबाजी करू लागल्याने समितीला तेथून काढता पाय घ्यावा लागला आणि अवघ्या सात-आठ मिनिटांतच समितीने कामकाज गुंडाळले. यावेळी दोन्हीकडील कार्यकर्त्यांकडून आरोप- प्रत्यारोप करण्यात आले. दरम्यान, या गोंधळाबाबत कामगार संघटनेने इतर संघटनांवर खापर फोडले तर अन्य संघटनांनी कामगार संघटनेवर सभा उधळल्याचा आरोप केल्याने सभेनंतर प्र्रवेशद्वारावरही घोषणाबाजी सुरू होती.संघटनेचा पूर्वनियोजित कटराज्य परिवहन प्रशासनाने एसटी कामगार संघटना करार करण्यात विलंब करीत असल्याचे कर्मचाऱ्यांसमोरच सांगितल्याने संघटनेचा खरा चेहरा समोर आला आहे. प्रशासन कराराच्या बाजूने असल्याने संघटनेला ही बाजू कर्मचाऱ्यांसमोर येऊ द्यायची नव्हती म्हणून त्यांनी गोंधळ घातला. समितीची सभा उधळून लावण्याचा कामगार संघटनेचा हा पूर्वनियोजित कट होता. - सुभाष जाधव, एस.टी. कामगार सेना, राज्य संघटक सचिवघोषणाबाजी सेनेकडूनचप्रशासनाची उपसमिती कामगारांची मते जाणून घेण्यासाठी नाशिकमध्ये आली होती. समिती केवळ कामगारांची मते जाणून घेणार होती. परंतु एसटी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. ही बाब आम्ही समितीच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. आम्ही फक्त वस्तुस्थिती समितीला सांगितली.- विजय पवार, अध्यक्ष, एस.टी. कामगार संघटना