शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभेत गोंधळ मात्र ओटीसी योजना मंजूर

By संजय पाठक | Published: September 30, 2023 5:20 PM

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सध्या प्रशासकीय राजवट असून बँकिंग परवाना रद्द करण्याची नोटीसही बँकेला बजावण्यात आली आहे.

नाशिक : नऊशे कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे अडचणीत आलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक गर्तेतुन बाहेर काढण्यासाठी ओटीसी म्हणजेच सामोपचार कर्ज परतफेड योजना  कर्जदारांसाठी राबवण्याचा निर्णय आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. मात्र या सभेत बँकेकडून सक्तीने होणारी वसुली आणि सभासदांच्या अडकलेले पैसे यावरून शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सध्या प्रशासकीय राजवट असून बँकिंग परवाना रद्द करण्याची नोटीसही बँकेला बजावण्यात आली आहे.

 दरम्यान, बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी थकबाकी वसूल करणे आवश्यक असून त्यासाठी थकबाकीदारांसाठी सामोपचार कर्ज परतफेड योजना  राबवण्याचा प्रस्ताव सभेत होता शेतकऱ्यांना त्यांची थकीत रक्कम देण्यासाठी तीन टप्प्यांमध्ये सवलत देण्यात येणार आहे मात्र यामुळे विविध कार्यकारी सोसायट्यांचे 200 ते 300 कोटी रुपयांच्या नुकसान होणार असल्यामुळे त्याची भरपाई राज्य शासनाने करावी या उपसूचननेसह या विषयाला मंजुरी देण्यात आली.

दरम्यान जिल्हा बँकेकडून मोठ्या सभासदांना मोठ्यांना सोडून छोट्या कर्जदार शेतकऱ्यांवर कारवाईचा आसूड उगारला जात आहे. वसुलीसाठी शेत जमिनीचे लिलाव काढून त्यावर बँक किंवा विविध कार्यकारी संस्थेचा बोजा चढवला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला त्याचप्रमाणे अडकलेल्या ठेवी मिळत नसल्यामुळे देखील अनेक सभासदांनी संताप व्यक्त केला. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार माणिकराव कोकाटे आणि माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी या सभेत हस्तक्षेप करून शेतकऱ्यांची समजूत काढली.

टॅग्स :Nashikनाशिक