विरोधकांच्या प्रतिमहासभेतच गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:40 AM2019-01-20T00:40:56+5:302019-01-20T00:41:19+5:30
सत्तारूढ भाजपाच्या विरोधात कधी नव्हे इतकी आक्रमक भूमिका घेतल्याचे विरोधकांनी दाखवले आणि महापौरांनी महासभा गुंडाळत याच सभागृहात प्रतिसभा घेण्याची तयारी सुरू केली, परंतु त्याचवेळी कॉँग्रेस नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी हा गोंधळ मॅनेज असल्याचा आरोप केल्याने पीठासनावर असलेले शेलार त्यांच्याकडे चालून आले आणि दोघांमध्ये कडाक्याचे वाद झाले. त्यामुळे गोंधळामध्ये पार पडलेल्या महासभेनंतर विरोधकांची प्रतिमहासभादेखील गोंधळातच पार पडली.
नाशिक : सत्तारूढ भाजपाच्या विरोधात कधी नव्हे इतकी आक्रमक भूमिका घेतल्याचे विरोधकांनी दाखवले आणि महापौरांनी महासभा गुंडाळत याच सभागृहात प्रतिसभा घेण्याची तयारी सुरू केली, परंतु त्याचवेळी कॉँग्रेस नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी हा गोंधळ मॅनेज असल्याचा आरोप केल्याने पीठासनावर असलेले शेलार त्यांच्याकडे चालून आले आणि दोघांमध्ये कडाक्याचे वाद झाले. त्यामुळे गोंधळामध्ये पार पडलेल्या महासभेनंतर विरोधकांची प्रतिमहासभादेखील गोंधळातच पार पडली.
शनिवारी (दि.१९) महापालिकेची महासभा महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बस कंपनीच्या इतिवृत्तावरून राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार आक्रमक झाले आणि पीठासनावर चालून गेले.