शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
2
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
4
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
5
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
6
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
7
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप
8
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
9
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
10
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
11
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
12
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
13
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
14
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
15
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
16
कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
17
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
18
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं
19
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
20
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे

दुकाने बंद करण्यावरून गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 10:39 PM

नाशिक : अनलॉक अंतर्गत शहरातील बाजारपेठा आणि अन्य सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने निर्बंध आणखी शिथिल करून दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली. परंतु दुसरीकडे मात्र यंत्रणेतील प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नेहेमीप्रमाणे बाजारपेठांमध्ये शिरून सायंकाळी ५ वाजताच दुकाने बंद करण्यास भाग पाडल्याने गोंधळ निर्माण झाला आहे

नाशिक : अनलॉक अंतर्गत शहरातील बाजारपेठा आणि अन्य सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने निर्बंध आणखी शिथिल करून दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली. परंतु दुसरीकडे मात्र यंत्रणेतील प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नेहेमीप्रमाणे बाजारपेठांमध्ये शिरून सायंकाळी ५ वाजताच दुकाने बंद करण्यास भाग पाडल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी, महापालिका आणि पोलीस आयुक्तांनी एकत्र बसून आणि पालकमंत्र्यांशी चर्चा करून हा निर्णय घोषित केला होता आणि यंत्रणेच्या अधिकारी-कर्मचाºयांनी पहिल्या च दिवशी हरताळ फासला.गेल्या आठवड्यात महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांना यासंदर्भात व्यापारी संघटनांची बैठक घेतली आणि दुकाने सुरू करण्यास सवलत दिली. केवळ बाजारपेठेतील दुकाने आणि तिही केवळ ५ वाजेपर्यंत खुली करण्यास मान्यता देण्यात आल्यानंतर दुकानदारांना सम आणि विषम तारखेस दुकाने खुली करण्याची अट घालण्यात आली. बुधवारी (दि.१०) प्रशासनातील अधिकाºयांनी एकत्रित बैठक घेऊन गर्दी टाळण्यासाठी दुकाने सुरू ठेवण्याची वेळ रात्री ९ वाजेपर्यंत वाढविली. गुरुवारी (दि.११) अंमलबजावणी सुरू होत असतानाच दुपारी साडेतीन वाजेनंतर महापालिका आणि पोलीस यंत्रणेच्या कर्मचाºयांनी व्हॅन आणि अन्य वाहनांतून ध्वनी क्षेपकाच्या माध्यमातून दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. यंत्रणेपुढे काहीच चालत नसल्याने अखेर दुकानदारांनी दुकाने बंद केली, त्यातून यंत्रणेचा गोंधळ स्पष्ट झाला.----------------------व्यावसायिकांत नाराजीप्रशासनाने सम आणि विषम तारखांनाच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली. या नियमातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, अनेक भागांत महापालिकेच्या कर्मचाºयांनी किराणा व्यवसाय तसेच दूध विक्रेत्यांच्या दुकानासमोर पी-वन आणि पी-टू रंगविले आणि काही ठिकाणी स्टिकर्स लावले आहेत. विशेष म्हणजे सम आणि विषमची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक व्यापारी संकुलांसमोरील बाजूला दुकानेच नाहीत, तेथेही हे स्टिकर्स लावण्यात आले आहेत.

 

टॅग्स :Nashikनाशिक