शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

फार्मसी प्रवेशाच्या गुणवत्ता यादीत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:23 AM

विविध व्यावसायिक अभ्यासक्र मांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राची अट शिथिल केल्यामुळे फार्मसीची अलॉटमेंट लिस्ट जाहीर करण्यात तंत्रशिक्षण संचालनालयाचा गोंधळ उडाला आहे.

नाशिक : विविध व्यावसायिक अभ्यासक्र मांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राची अट शिथिल केल्यामुळे फार्मसीची अलॉटमेंट लिस्ट जाहीर करण्यात तंत्रशिक्षण संचालनालयाचा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे फार्मसी पदवी प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली असून, तांत्रिक चुकीमुळे संचालनालयाने संकेतस्थळावर यादी जाहीर करून मागे घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.  तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) आपल्या संकेतस्थळावर फार्मसी पदवी अभ्यासक्र माची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी (दि. २८) प्रसिद्ध केली होती; मात्र त्यातील तांत्रिक चुका लक्षात आल्यानंतर डीटीईने ही गुणवत्ता यादी काढून घेतली. त्यामुळे प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. संकेतस्थळावरील टोल फ्र ी क्र मांकावर संपर्क करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. संकेतस्थळावर पुढील सूचना प्राप्त होइपर्यंत प्रवेशप्रक्रि या थांबविण्याची सूचना डीटीईने प्रसिद्ध केली असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना आता सुधारित गुणवत्ता यादीची प्रतीक्षा करावी लागत आहे. व्यावसायिक अभ्यासक्र माच्या प्रवेशासाठी मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राची सक्ती केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नाईलाजाने खुल्या गटातून अर्ज केला होता. जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दि.२८ जूनपर्यंत अंतिम मुदत होती. त्या आधारे डीटीईने फार्मसीची पहिली गुणवत्ता यादी तयार केली होती; परंतु जातपडताळणी विषयीच्या झालेल्या घडामोडींमुळे प्रवेशप्रक्रियाही प्रभावित झाल्याने पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होऊनही मागे घेतल्याचा अंदाज प्राचार्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी