भुरट्या चोऱ्या वाढल्याने चिंता
नाशिक : शहर परीसरात भुरट्या चोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरीकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अनेकवेळा किरकोळ चोरीची फिर्याद दाखल करुन घेतली जात नसल्याने नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यामुळे भुरट्या चोरांचे फावते. पोलिसांनी भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.
महागाई वाढल्याने नाराजी
नाशिक : पेट्रोल , डिझेलच्या किमती वाढल्याने वाहतुकदारांनी वाहतुक दरात वाढ केली आहे. यामुळे अनेक वस्तुंच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामांन्य नागरीकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोविड संकटामुळे नागरीक अडचणीत असताना महागाई वाढल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्याची मागणी होत आहे.
घाणीमुळे आरोग्याचा प्रश्न
नाशिक : येथील बाजार समितीमध्ये काही भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.यामुळे बाजार समितीमध्ये येणाऱ्या नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजार समिती प्रशासनाने परिसरात स्वच्छता करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
वीजबिल भरण्यासाठी जनजागृती
नाशिक : मार्च अखेरमुळे राज्य वीज वितरण कंपनीच्यावतीने वीजबिल वसुली मोहीम सुरु केली असून यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. नागरीकांनी बिल भरावे यासाठी रिक्षाला ध्वनिक्षेपक लावुन बिल भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. काही ठिकाणी वीज जोडणी खंडीत करण्याची कारवाईही केली जात आहे.
इुच्छु्कांकडून निवडणुकांची तयारी
नाशिक : महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने अनेक इच्छुकांना आपापल्या परीने जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नवीन कार्यकर्त्याशी संपर्क साधला जात आहे.
दुरुस्त केलेले पथदिप पुन्हा बंद
नाशिक : गांधीनगर परिसरात दुरुस्त करण्यात आलेले पथदिप दुसऱ्याच दिवशी पुन्हा बंद पडल्याने आश्चर्य व्यक्त जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथील चौकातील पथदिप बंद होते. ते दुरुस्त करण्यात आले मात्र दुरुस्तीनंतर लगेचच तेथील दिवे बंद झाल्याने परिसरात रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य पसरते. या पथदिपांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.
उद्यानांची स्वच्छता करण्याची मागणी
नाशिक : शहरातील विविध उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून काही ठिकाणी खेळण्यांची मोडतोड झाली आहे. यामुळे नागरीकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने उद्यानांची स्वच्छता करावी अशी मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.