नाशिक : जिल्हा परिषदेच्या आवारात चारचाकी वाहने लावण्यावरून दैनंदिन अडचणी उद्भवत असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने चारचाकी वाहनांबाबत यादीच सुरक्षा रक्षकाकडे दिल्यानंतरही काही सदस्य अन्य वाहने आणून प्रवेशासाठी सुरक्षा रक्षकाला अरेरावी करीत असल्याचे प्रकार घडतात. शुक्रवारी (दि. ८) दुपारी चारचाकी वाहन लावण्यावरून असाच प्रकार घडल्याची चर्चा परिषदेत चर्चा आहे.एका महिला जिल्हा परिषद सदस्याचे पतिराज त्यांनी दिलेल्या वाहनाच्या नोेंदी व्यतिरिक्त दुसरेच वाहन जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात दुपारी घेऊन आले. त्यावेळी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकाने या वाहनाचा नंबर प्रशासनाने दिलेल्या जिल्हा परिषद सदस्यांच्या चारचाकी वाहनांच्या यादीत नसल्याचे पाहत या वाहनाला प्रवेश नाकारला. आधीच सत्ताधारी त्यात धनुर्धारी पक्षाचे महिला सदस्य असलेल्या या महिला जिल्हा परिषदेच्या पतिराजाने मग मुख्यालयाच्या प्रवेशद्वारातून चारचाकी वाहन आत घुसवून आपले वाहन इथेच राहील, काढून दाखवा, असे आव्हान बिचाºया सुरक्षा रक्षकास देत प्रसंगी पदाधिकारी व अधिकाºयांना शिव्याशापांची लाखोली वाहण्यास सुरुवात केली. इतके कमी होते की काय म्हणून, या महिला सदस्य पतिराजाने पहिल्या मजल्यावरील एका पदाधिकाºयाच्या जात परिचरांना पाणी आणि चहा आणण्याचे फर्मान सोडले. परिचरांकडून पाणी देण्यास थोडा विलंब होताच, त्यांच्याही कुळाचा उद्धार त्यांना ऐकावा लागल्याची जिल्हा परिषदेत चर्चा आहे.
महिला पतिराजाचा मिनी मंत्रालयात गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 12:15 AM