शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

‘कोरोना वॉरियर्स’सह सर्व डॉक्टरांना मानाचा मुजरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 10:16 PM

नाशिक : यंदा मार्चपासून पसरू लागलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात हजारो डॉक्टर्सनी प्रत्यक्ष कोरोनाबाधितांवर उपचार केले, त्या डॉक्टरांना मानाचा मुजरा. त्याचबरोबर अशा रोगग्रस्त वातावरणात प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित असण्याची शक्यता असूनही ज्या डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या विविध प्रकारच्या रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे केले, अशा सर्व डॉक्टरांना सलाम करण्याचा दिवस म्हणूनच यंदाचा ‘डॉक्टर्स डे’ साजरा केला जाणार आहे.

ठळक मुद्देडॉक्टरांना सलाम करण्याचा दिवस म्हणूनच यंदाचा ‘डॉक्टर्स डे’ साजरा केला जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : यंदा मार्चपासून पसरू लागलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात हजारो डॉक्टर्सनी प्रत्यक्ष कोरोनाबाधितांवर उपचार केले, त्या डॉक्टरांना मानाचा मुजरा. त्याचबरोबर अशा रोगग्रस्त वातावरणात प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित असण्याची शक्यता असूनही ज्या डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या विविध प्रकारच्या रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे केले, अशा सर्व डॉक्टरांना सलाम करण्याचा दिवस म्हणूनच यंदाचा ‘डॉक्टर्स डे’ साजरा केला जाणार आहे.भारतात दरवर्षी १ जुलैला ‘डॉक्टर्स डे’ साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने दरवर्षीच्या ‘डॉक्टर्स डे’ची संकल्पना निश्चित केली जाते. त्यात यंदा कोरोना वॉरियर्ससह सर्वच डॉक्टरांना मानाचा मुजरा करण्याच्या संकल्पनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार बुधवारी (दि. १ जुलै) इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनेदेखील डॉक्टरांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

कोरोनावर प्रत्यक्ष उपचार करणारे आणि या काळात स्वत:चा जीव संकटात घालून अन्य रुग्णांसाठीदेखील सेवा देणाºया डॉक्टरांच्या कार्याची नोंद इतिहासात केली जाईल, इतकी मोलाची आहे. त्यामुळेच आयएमएच्या वतीने सर्व डॉक्टरांना सन्मानपत्र देऊन त्यांना मानाचा मुजरा करण्यात येणार आहे.- डॉ. समीर चंद्रात्रे, अध्यक्ष, आयएमए, नाशिक

संपूर्ण जग हे स्वत:ची सुरक्षितता जपत असताना प्रत्येक डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्र स्वत:च्या जिवावर उदार होऊन सेवा देत असल्याचा अभिमान आहे. कोविड किंवा नॉनकोविड रुग्णांसाठी हॉस्पिटल्सचा प्रचंड खर्च होत असताना केवळ मोठ्या बिलांचे अवास्तव आकडे प्रसारित करून या सेवारत डॉक्टरांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न होऊ नये.- डॉ. राज नगरकर, कॅन्सर तज्ज्ञ

स्वत:चा जीव धोक्यात येण्याची शक्यता असून देखील स्त्री रोग तज्ज्ञांनीदेखील या काळात आपापले कर्तव्य पार पाडले आहे. प्रत्येक डॉक्टरच्या मनात भीती, धाकधूक असली तरी आपल्या रुग्णांना अशा काळातही आपण सेवा देत असल्याचे समाधान प्रत्येक स्त्रीरोग तज्ज्ञाला आणि सर्व कार्यरत डॉक्टरांना आहे.- डॉ. निवेदिता पवार, स्त्रीरोग तज्ज्ञ

कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक धोका हा ज्येष्ठ नागरिक आणि बालकांसाठीच असतो. शतकातून एकदा येणाºया अशा पॅँडेमिकच्या काळात बालरोगतज्ज्ञ म्हणून सेवा बजावता आली, तसेच कोविड रुग्णालयाचे कामकाज प्रभावीपणे हाताळता आले त्याचा सार्थ अभिमान आहे. खºया अर्थाने गरज असताना समस्त डॉक्टरांनी बजावलेली सेवा त्यांची कार्याप्रती आणि समाजाप्रती असलेली कटिबद्धता अधोरेखित करणारी ठरली.- डॉ. सुशील पारख, बालरोगतज्ज्ञघराबाहेरील कोणत्याही जागेपेक्षा हॉस्पिटल्समध्ये आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात असल्याने कोणतेही हॉस्पिटल ही सुरक्षित जागा आहे. त्यामुळे आजाराची प्रारंभिक लक्षणे दिसली तरी नागरिकांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच कोरोनाच्या रुग्णांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना थेट वाळीत टाकले जाण्याचे प्रकार होऊ नयेत.- डॉ. मनोज चोपडा, हृदयरोग तज्ज्ञ

शतकातील सर्वांत मोठ्या पेचप्रसंगाच्या काळात आपण डॉक्टर म्हणून सामान्य रुग्णांना सेवा देऊ शकलो, याचा अभिमान आहे. तसेच समस्त डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्राने जिवाची बाजी लावत या काळात आपली सर्वोत्तम सेवा नोंदवली आहे. त्यामुळे समाजात मध्यंतरीच्या काळात घसरलेली डॉक्टरांची प्रतिमा पुन्हा उंचावली आहे.-वैद्य विक्रांत जाधव, आयुर्वेदतज्ज्ञआमच्याकडे येणाºया पेशंटमध्ये दोन तृतीयांश रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक असल्याने अधिक काळजी घ्यावी लागते. प्रत्येक रुग्णाला डोळ्यांच्या काळजीइतकीच कोविडबाबत जनजागृती करत आहोत. तसेच रुग्णांना हात धुण्यासह स्वच्छ मास्क वापरण्याचे महत्त्व पटवून स्वत:ची सुरक्षितता कशी करावी, त्याबाबत प्रबोधन करण्यावर भर देण्यात आला आहे.- डॉ. शरद पाटील, नेत्ररोग तज्ज्ञ

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर