नाशिक : बाप्पाच्या स्थापनेनंतर भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषिपंचमीनिमित्त शुक्रवारी(दि.१४) महिलांनी गंगेवर स्नानासाठी गर्दी केली होती. देवदर्शनाचाही लाभ घेतला. रजस्वाचा दोष नाहीसा करण्यासाठी प्रायश्चित्त म्हणून हे व्रत केले जाते. या तिथीला सप्तऋषींची पूजा केली जाते.हिंदू धर्मामध्ये वेदांचे खूप महत्त्व आहे. चारही वेदांमध्ये हजारो मंत्र असून, या मंत्रांची रचना ऋषिमुनींनी केली आहे. मंत्र रचनेमध्ये विविध ऋषींचे योगदान असून, यामध्ये सप्तर्षींचे योगदान सर्वांत जास्त मानले गेले आहे. महिलांनी स्नान, देवदर्शनासह सोळा भाज्यांचे सेवन अर्थात ऋषिपंचमीच्या भाजीचा नैवेद्य दाखवत सेवनावर भर दिला. ऋषिपंचमीच्या व्रतात कश्यप, अत्री, भारद्वाज, प्रभृती अशा सात ऋषींची अरुंधतीसह पूजा करतात. हे व्रत करणाऱ्याने केवळ शाकभाज्या, भगर, वरीचे तांदूळ, कंदमुळे, फळे खाऊन राहावे, असा नियम आहे. महिलांनी रामकुंडावर स्नानासाठी मोठी गर्दी केली होती.
ऋषिपंचमीनिमित्त महिलांची गंगास्नानासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:28 AM