नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त शहरातील कौमुदीप्रेरित महिला संघाच्या वतीने सोमवार (दि.२३) रोजी महिलांनी दिंडीचे आयोजन केले होते. प्रारंभी कौमुदी परिवाराच्या वतीने नामदेव विठ्ठल मंदिरात आरती करण्यात आली. सकाळी ७ वाजता उद्योजक कविता दगावकर व आर्किटेक्ट अमृता पवार यांच्या हस्ते कॉलेजरोड येथील विठ्ठल मंदिरापासून दिंडीची सुरुवात करण्यात आली होती. शहरातील कॉलेजरोड, निर्माण सर्कल, विद्या विकास सर्कलमार्गे काढण्यात आलेल्या या दिंडीची सांगता गंगापूररोड येथील तुळजाभवानी मंदिराजवळ करण्यात आली. संस्थेच्या संचालक सुनीता तळवेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षांपासून सुरू करण्यात आलेली ही दिंडी आगळीवेगळी ठरली. दिंडीत महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करीत पालखी मिरवणुकीत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. अश्वारूढ होत महिलांनी सादर केलेल्या रिंगण सोहळ्याने उपस्थितांचे लक्ष वेधले होते. यावेळी संस्थेच्या संचालक लक्ष्मी गुजर, वुमन वॉकथॉनच्या सोनाली दाबक, यस बँकेच्या व्यवस्थापक गौरी तळवेलकर, अभिजित वैद्य, राजेश कोठावदे, विशाखा शिनकर, जयश्री दामले, अनिता कोठावदे, आरती पाटील, सोनाली पवार, सुनीता अमृतकर, सुनीता दुसाणे, संगीता सोनवणे, संगीता मोराणकर, योगीता सोनवणे, कल्पना पवार आदी उपस्थित होते.
कौमुदीप्रेरित महिला संघाचा रिंगण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:29 AM