केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी कॉँग्रेस आक्रमक : लोकशाहीचा गळा घोटल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:49 AM2018-05-19T01:49:46+5:302018-05-19T01:49:46+5:30
नाशिक : कर्नाटकमध्ये कॉँग्रेस व जेडीयूचे सर्वाधिक संख्याबळ असतानाही राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापन करण्यासाठी पाचारण केल्याने राज्यपालांनी दबावाखाली निर्णय घेतल्याचा आरोप करीत शहर कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत निदर्शने केली.
नाशिक : कर्नाटकमध्ये कॉँग्रेस व जेडीयूचे सर्वाधिक संख्याबळ असतानाही राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापन करण्यासाठी पाचारण केल्याने राज्यपालांनी केंद्र सरकारच्या दबावाखाली सदरचा निर्णय घेतल्याचा आरोप करीत शुक्रवारी शहर कॉँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणा देत निदर्शने केली. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
दुपारी १२ वाजता शहर कॉँग्रेस भवनापासून मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकºयांनी कॉँग्रेसचे ध्वज व विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेतले होते. त्यात प्रामुख्याने ‘संसदेत शिरताना करतात वाकून नमस्कार, प्रत्यक्षात त्यांच्या मनात लोकशाही बद्दल तिरस्कार’, ‘सत्तेचा दुरुपयोग करणाºया केंद्र सरकारचा निषेध असो’ असे फलक होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत निदर्शने करण्यात
आल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यपालांनी कर्नाटकात भाजपाला सरकार स्थापन्याची संधी देऊन लोकशाही व घटनेतील तरतुदींचा खून केला आहे. यापूर्वी मेघालय, मणिपूर, गोवा या राज्यात कॉँग्रेस पक्षाला सर्वात जास्त जागा मिळूनही संधी नाकारण्यात आली होती. कर्नाटकात राज्यपालांनी केंद्र सरकारच्या दबावाखाली येऊन हा निर्णय घेतला असून, अल्प मतात असूनही भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन लोकशाही तत्त्वाला काळीमा फासला आहे. भाजपा व केंद्र सरकार देशाला हुकूमशाहीकडे नेत असल्याने राष्टÑपतींनी यात हस्तक्षेप करून लोकशाहीचे रक्षण करावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या आंदोलनात माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, आशा तडवी, लक्ष्मण जायभावे, सुचिता बच्छाव, सुरेश मारू, मुन्ना ठाकूर, बबलू खैरे, हनिफ बशीर, उद्धव पवार, रफीक तडवी, रुबिना शेख, इसाक कुरेशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.