नाशिक : केंद्र सरकाने आणेलल्या शेतकरी उत्पादन, व्यापार आणि वाणिज्य विधेयकासह, शेतकरी सबलीकरण व संरक्षण विधेयक आणि सेवा व आवश्यक वस्तू विधेयकांच्या विरोधात नाशिक शहर काँग्रेसतर्फे गुरुवारी (दि.३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
नाशिक शहर काँग्रेसतर्फे संपूर्ण देशभरात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देतानाच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केंद्र सरकारने आणलेल्या तीनही कृषी विधेयकांना विरोध नोंदविला आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्याचप्रमाणे केंद्र सरकार भाडवलदारांंची गुलामी करीत असल्याचा आरोपही काँग्रेसतर्फे करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या माजी आरोग्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद अहेर, नगरसेवक वत्सला खैरे, नीलेश खैरे, हनिफ बशीर, सुरेश मारू, वसंत ठाकूर, पोपट नागपुरे, धोंडीराम बोडके, दत्ता कासार, आकाश घोलप, देवराम सैंदाणे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.