महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार माजी मंत्री शोभा बच्छाव, अध्यक्षा वत्सला खैरे, डॉ. हेमलता पाटील, आशा तडवी यांच्या नेतृत्वाखाली महागाईच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी मातीची चूल, लाकडाची मोळी, गोवऱ्या, धान्याची रास रस्त्यावर मांडत निषेध नोंदवला. याप्रसंगी बोलताना वत्सला खैरे यांनी, केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलांसह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. असे सांगितले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात शहर अध्यक्ष शरद आहेर, सुरेश मारू, वसंत ठाकूर, उध्दव पवार, चारुशिला शिरोडे, ज्युली डिसुझा, वंदना पाटील, चारू काळे, अरुणा आहेर, समिना पठाण, सुचेता बच्छाव, आशा मोहिते, सुलभा निकम, कुसुम चव्हाण, मनीषा मालूजकर, वनिता मुकणे, मंजुळा शेजवळ, जयश्री नगरे, मीना दिवाय, स्वाती जाधव, लक्ष्मण धोत्रे, संतोष हिवाळे आदी सहभागी झाले होते.
(फोटो ०९ काँग्रेस)