नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक, दिंडोरी व मालेगाव अशा उत्तर महाराष्टÑातील तिन्ही जागांवर कॉँग्रेसने दावा सांगितला असून, यासंदर्भात शुक्रवारी मुंबईत झालेल्या पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीतील बैठकीत जिल्ह्णातील कॉँग्रेसच्या नेत्यांनी आपली मागणी नोंदवितानाच विजयाचे गणितही मांडले.लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून कॉँग्रेस पक्षाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्णातील लोकसभा मतदार संघनिहाय आढावा तसेच इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे. शुक्रवारी उत्तर महाराष्टÑातील पदाधिकाऱ्यांना त्यासाठी मुंबईत पाचारण करण्यात आले. त्यावेळी नाशिक जिल्ह्णातील नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघ तसेच धुळे मतदारसंघाबाबतची राजकीय परिस्थिती विशद करण्यात आली. सन २०१४ च्या तुलनेत पक्षाची असलेली स्थिती, बदललेल्या राजकीय व सामाजिक समीकरणांचा विचार करता, पक्षासाठी अनुकूल वातावरण असून, नाशिक व दिंडोरी हे दोन्ही मतदारसंघ सध्या राष्टÑवादीच्या वाट्याला असले तरी, हे दोन्ही मतदार संघ येत्या निवडणुकीत कॉँग्रेससाठी सोडावेत, अशी मागणी करण्यात आली.धुळे मतदारसंघातील दोन विधानसभा मतदार संघ नाशिक जिल्ह्णात असल्यामुळे मालेगावचे डॉ. तुषार शेवाळे यांनी प्रबळ दावेदारी केली. पक्ष निरीक्षकांनी उत्तर महाराष्टÑाचा आढावा घेतला असून, राष्टÑवादीसोबत पक्षाशी बोलणीदरम्यान याचा निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले.शोभा बच्छाव, राजाराम पानगव्हाणेही इच्छुकच्नाशिकमधून छगन भुजबळ निवडणूक लढविणार असतील तर काही हरकत नाही, मात्र ते नसतील तर कॉँग्रेस उमेदवारी करण्यास सक्षम असल्याचे सांगण्यात आले. यावेळी नाशिकमधून शोभा बच्छाव, राजाराम पानगव्हाणे यांनी तयारी दर्शविली. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी दिवंगत माजी खासदार झेड. एम. कहांडळ यांचे पुत्र रमेश कहांडळ, काशीनाथ बहिरम आदी इच्छुक आहेत.
लोकसभेच्या तिन्ही जागांवर कॉँग्रेसचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 1:43 AM
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक, दिंडोरी व मालेगाव अशा उत्तर महाराष्टÑातील तिन्ही जागांवर कॉँग्रेसने दावा सांगितला असून, यासंदर्भात शुक्रवारी मुंबईत झालेल्या पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीतील बैठकीत जिल्ह्णातील कॉँग्रेसच्या नेत्यांनी आपली मागणी नोंदवितानाच विजयाचे गणितही मांडले.
ठळक मुद्देमुंबईत बैठक : जिल्ह्यातील नेत्यांनी मांडले विजयाचे गणित