जिल्ह्यातील सात जागांवर कॉँग्रेसचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 01:13 AM2019-07-27T01:13:07+5:302019-07-27T01:13:34+5:30

काँग्रेस पक्षाची ताकद व निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या पाहता जिल्ह्णातील पंधरा पैकी सात जागा पक्षाला मिळाव्यात, त्यातही नाशिक शहरातील तीन जागा हक्काने मागून घ्याव्यात अशा आग्रह जिल्ह्णातील काँग्रेस जणांनी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे धरला.

 Congress claims seven seats in the district | जिल्ह्यातील सात जागांवर कॉँग्रेसचा दावा

जिल्ह्यातील सात जागांवर कॉँग्रेसचा दावा

Next

नाशिक : काँग्रेस पक्षाची ताकद व निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या पाहता जिल्ह्णातील पंधरा पैकी सात जागा पक्षाला मिळाव्यात, त्यातही नाशिक शहरातील तीन जागा हक्काने मागून घ्याव्यात अशा आग्रह जिल्ह्णातील काँग्रेस जणांनी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे धरला. गेल्यावेळी आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवितांना ९ जागा राष्टÑवादी, तर सहा जागा कॉँग्रेसला होत्या. मात्र आता सात सात जागा दोन्ही पक्षांना द्याव्यात, असाही आग्रह धरण्यात आला आहे.
कॉँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तूपसाखरे लॉन्स येथे उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस पदाधिकारी व निवडणूक इच्छुक यांच्याशी प्रदेश पदाधिकारी यांनी स्वतंत्र संवाद साधून माहिती जाणून घेतली. यावेळी शहर अध्यक्ष शरद आहेर यांनी आढावा सादर केला, ते म्हणाले, शहरात काँग्रेस पक्षाला चांगले वातावरण असून, पारंपरिक मतदार अजूनही काँग्रेससोबत आहेत, लोकसभेची निवडणूक वेगळी होती, आता वेगळी परिस्थिती आहे हे लक्षात घेता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जागावाटप करताना काँग्रेसला समान जागा मिळाव्यात, विशेष करून नाशिक शहरात मध्य, पूर्व व पश्चिम या तीन मतदारसंघात पक्षाकडे अनेक इच्छुक आहेत, त्यामुळे जागावाटप करताना शहरातील चार पैकी तीन जागा आपल्याला मिळाव्यात, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातदेखील गेल्या वेळच्या तुलनेत एक जागा अधिक मिळावी, विधानसभेत पक्षाचे अधिक प्रतिनिधी गेल्यास त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होतो, त्या ताब्यात घेण्यासाठी विधानसभा निवडणुकीत पक्षाला जादा जागा मिळाव्यात, अशी मागणी केली.
नाशिक जिल्ह्णातील ग्रामीण भागातील प्रत्येक तालुका अध्यक्ष यांनी तसेच जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनीही पक्ष संघटनात्मक आढावा सादर केला, लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी, बूथनिहाय कार्यकर्त्यांची नेमणूक, पक्षाने दिलेले कार्यक्र म, जनतेच्या प्रश्नावर केलेली आंदोलने याची माहिती सादर करून, कोणते विधानसभा मतदारसंघ पक्षाला अनुकूल आहेत याची माहिती देऊन संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चाही घडवून आणण्यात आली. गेल्यावेळी नाशिक जिल्ह्णात कॉँग्रेस आणि राष्टÑवादीने स्वतंत्र निवडणुका लढविल्या असल्या तरी तत्पूूर्वी दोन्ही पक्षांनी नऊ आणि सहा अशा जागा लढविल्या होत्या. मात्र आता पंधरा पैकी सात- सात अशा जागा कॉँग्रेस-राष्टÑवादीने घ्याव्यात आणि एक जागा समविचारी पक्ष असलेल्या माकपासाठी सोडावी अशाप्रकारची मागणी करण्यात आली. नाशिक शहर व ग्रामीण जिल्ह्णाची स्वतंत्र बैठक घेण्यात आली.
मतदारसंघात मेळावे घ्या
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्या मतदारसंघात पक्षाला अनुकूल वातावरण असल्याचे सांगून, एकापेक्षा अधिक इच्छुकांची नावाची चर्चा घडवून आणली, त्यावर प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सर्वांना उद्देशून, पक्षाची व उमेदवाराची ताकद दाखविण्यासाठी मतदारसंघात मेळावे आयोजित करा, त्यासाठी आम्ही येऊ असे सांगितले. निवडणूक तोंडावर असून, फक्त पक्षाला जिंकून आणायचे आहे हे लक्षात घेऊन काम करा तसेच बूथ कमिट्या सक्षम करण्याच्या सूचना केल्या.
राष्टÑवादीच्या या तीन जागांवर दावा
दिंडोरी, मनमाड-नांदगाव आणि चांदवड हे राष्टÑवादीचे तीन मतदारसंघ काँग्रेसला मिळावे अशाप्रकारची मागणी तेथील तालुका अध्यक्षांनी केली. दिंडोरी हा पारंपरिक काँग्रेस पक्षाचा मतदारसंघ असून, तो पक्षाला परत मिळावा. चांदवडमध्ये गेल्या निवडणुकीत कॉँग्रेसला दुसºया क्रमांकांची मते असल्याने हा मतदारसंघही मिळावा त्याचप्रमाणे नांदगाव-मनमाड मतदारसंघात राष्टÑवादीच्या विरोधात जनमत उभे राहत असल्याने हा मतदारसंघदेखील काँग्रेसला मिळावा, अशी मागणी करण्यात आली. सिन्नर तालुक्यात कॉँग्रेस पक्षाची अवस्था बिकट असल्याने स्थानिक पदाधिकाºयांनी हा मतदारसंघ सोडावा, अशी मागणी केली नसल्याचे समजते.

Web Title:  Congress claims seven seats in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.