कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:49 PM2018-10-15T23:49:50+5:302018-10-15T23:56:59+5:30

दिंडोरी : वीज मंडळाचा कारभार सुधारावा, भारनियमन कमी करण्यात यावे व पेट्रोल, डिझेल दरवाढ, शेतमालाच्या कोसळलेला भाव, दुष्काळी स्थिती, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आदी प्रश्नांसंबंधी दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पार्टीच्या वतीने शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर सोमवारी सकाळी जनआंदोलन मोर्चा काढण्यात आला.

Congress-NCP Front | कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा मोर्चा

कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा मोर्चा

Next
ठळक मुद्देजनआंदोलन : भारनियमन कमी करण्याची मागणी; इंधन दरवाढीचा निषेध

दिंडोरी : वीज मंडळाचा कारभार सुधारावा, भारनियमन कमी करण्यात यावे व पेट्रोल, डिझेल दरवाढ, शेतमालाच्या कोसळलेला भाव, दुष्काळी स्थिती, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आदी प्रश्नांसंबंधी दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस पार्टीच्या वतीने शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर सोमवारी सकाळी जनआंदोलन मोर्चा काढण्यात आला.
आमदार नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीराम शेटे, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड आदींच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चोत झिरवाळ यांनी राज्यातील युती शासनाच्या कारभारावर जोरदार टीका करत हल्लाबोल केला. केवळ नियोजन नसल्याने विजेचे संकट निर्माण झाले असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, असे त्यांनी सांगितले.
कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी, पाणी कपातीचे मोठे संकट उभे राहिले असून, शेतकºयांनी पाणी मागणी अर्ज भरून आपले हक्काचे पाणी आरक्षित करावे, असे आवाहन केले. सरकारने पेट्रोल, डिझेल गॅस, खते, औषधे, कृषी अवजारे यांच्या किमती कमी करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी भास्कर भगरे, सुनील आव्हाड, प्रकाश वडजे, अनिल देशमुख, पंडितराव गायकवाड, स्वप्नील गायकवाड, नरेश देशमुख, सचिन देशमुख, विलास कड, राजेंद्र ढगे, गोपीनाथ पाटील, शेखर देशमुख, रामदास धात्रक, शंकर काठे, संपत भरसट, आनंदराव चौधरी, डॉ. योगेश गोसावी उपस्थित होते.हक्काच्या पाण्यासाठी एकत्र यादुष्काळी स्थिती पाहता जायकवाडी धरणात कमी पाणीसाठा झाल्याने शासनदरबारी दिंडोरी तालुक्यातील शेतकºयांचे सिंचनाचे पाणी कपात करून ते पिण्यासाठी जायकवाडीत सोडण्याचा घाट घातला जात आहे. यास आपला तीव्र विरोध राहणार असून, कागदावर दिंडोरीत पाऊस जास्त दिसत असला तरी कुठे अत्यल्प तर कुठे जास्त पाऊस झाला आहे. धरणक्षेत्रात पाऊस झाला तसा वळण योजनांमुळे पाणीसाठा पूर्ण झाला. तालुक्यात दुष्काळाच्या झळा दिसत आहेत. कोणत्याही परिस्थितीत या धरणावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या व शेतीसिंचनाच्या पाण्यात कपात करू नये व जयकवाडीला पाणी सोडू नये, अशी मागणी करत वेळप्रसंगी कुंदेवाडी येथून रेल्वेने पिण्यासाठी पाणी देता येईल. तरी या व वीज प्रश्नावर सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले.

Web Title: Congress-NCP Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.