सटाणा : बागलाणचा शेतकरी हा जमिनीतून सोने पिकविणारा असल्यामुळे त्याला पाण्याचे महत्व कळते .मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या मंडळीने आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी बागलाणच्या सिंचन प्रकल्पांना खिट्टी घालून अशा कष्टकरी शेतकर्याला शेतीच्या पाण्यापासून नेहमीच वंचित ठेवण्याचे पाप केले असल्याची टीका केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केली.जिल्हापरिषद ,पंचायत समतिी निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आज बुधवारी दुपारी बागलाण तालुक्यातील अंबासन ,खिरामानी ,जायखेडा ,आराई ,वायगाव जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी डॉ.भामरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसवर सडकून टीका केली. डॉ.भामरे यांनी पाणी प्रश्नावर लक्ष केंद्रित करत बागलाण तालुक्यात हरणबारी डावा ,उजवा कालवा ,तळवाडे भामेर पोच कालवा ,साल्हेर ,वाघंबा ,हरणटेकडी वळण योजना ,केळझर चारी क्रमांक आठ या जिव्हाळ्याच्या प्रश्नांचे नेहमीच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंडळीने राजकारण केले, असा आरोप केला.या निवडणुकीत विकास कामांना खीळ घालणार्या झारीतल्या शुक्र ाचार्यांना गाडून भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले. या प्रचार दौर्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव ,तालुकाध्यक्ष संजय भामरे ,आण्णा सावंत ,डॉ.विलास बच्छाव ,डॉ.शेषराव पाटील ,डॉ.सी.एन. पाटील,निलेश पाकळे ,मंगेश खैरनार ,अविनाश सावंत ,नारायण कोर ,डॉ.दिकपाल गिराशे ,साहेबराव सोनवणे ,ब्राम्हणगाव गटाच्या उमेदवार लता बच्छाव ,ठेंगोडा गटाच्या मीना मोरे ,नामपुरचे कन्हू गायकवाड आदी उपस्थित होते . (वार्ताहर)
कॉँग्रेस, राष्ट्रवादीची सिंचन प्रकल्पांना खिट्टी
By admin | Published: February 16, 2017 12:56 AM