नाशिक : अल्पवयीन मुलगी विनयभंगप्रकरणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून सात संशयितांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात अशोक बापू दांडेकर (३२, इंदिरानगर वसाहत क्रमांक १, शिवाजी चौक, सिडको) यांचा जागीच मृत्यू झाला़ तर त्यांचा चुलतभाऊ तात्या बाबू दांडेकर (२९) हा गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी (दि़१२) दुपारच्या सुमारास सिडकोतील स्टेट बँक चौकात सदर घटना घडली़ दरम्यान, जखमी तात्या दांडेकरला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यास पुढील उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अशोक बापू दांडेकर, तात्या दांडेकर, मारुती दांडेकर व दिलीप बापू दांडेकर हे सिडकोतील स्टेट बँक चौकात उभे होते़ त्यावेळी रिक्षातून (एमएच १५, इएस २५२२) आलेले संशयित विनायक गायकवाड, मोहन काळे, ठकूबाई काळे, सुंदराबाई गायकवाड, अशोक काळे हे दोन साथीदारांसह आले आणि अचानक लोखंडी रॉड, दारूच्या बाटल्या व लाकडी दांडक्याने अशोक दांडेकर व तात्या दांडेकर यांच्यावर हल्ला केला़ यामध्ये अशोक दांडेकर यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर तात्या दांडेकर जबर जखमी झाले़ त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्यात आले़
माजी मुख्यमंत्र्यांसमोर काँग्रेसमधील गटबाजीचे प्रदर्शन
By admin | Published: May 12, 2016 11:53 PM