सरकारच्या विरोधात कॉँग्रेसचे ‘निषेधासन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:18 AM2018-11-11T00:18:17+5:302018-11-11T00:18:38+5:30
राज्य सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी केलेल्या विविध घोषणांची पूर्ती न करणाऱ्या राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ युवक कॉँग्रेसच्या वतीने बुधवारी सकाळी गोल्फ क्लब मैदानावर निषेधासनाचे आंदोलन करण्यात आले.
नाशिक : राज्य सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी केलेल्या विविध घोषणांची पूर्ती न करणाऱ्या राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ युवक कॉँग्रेसच्या वतीने बुधवारी सकाळी गोल्फ क्लब मैदानावर निषेधासनाचे आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांनी राज्य सरकारचे वाभाडे काढणारी वेगवेगळ्या प्रकारची बारा आसने करून उपस्थितांचे मनोरंजन केले. राज्यातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना सरकारच्या कारकिर्दीला बुधवारी चार वर्षे पूर्ण झाली असून, या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी केलेल्या घोेषणा व आश्वसनांची पूर्तता केली नसल्याने या सरकारच्या निषेधार्थ आंदोलनाची घोषणा युवक कॉँग्रेसने केली होती. केंद्र व राज्य सरकारला योगाची भाषा अधिक कळते त्यामुळे योगाच्या माध्यमातूनच निषेधासन करून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सकाळी नऊ वाजता गोल्फ क्लब मैदानावर जमलेल्या कॉँग्रेसजनांनी अगोदर राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मैदानात आसने करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ‘कर्जमाफी कधी मिळणार, अभ्यास सुरू आहे’, ‘रोजगार कधी मिळणार, अभ्यास सुरू आहे’ अशा प्रकारची उपहासात्मक घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून शेतकºयांच्या हितासाठी सरकारला सुुबुद्धी मागणारी प्रार्थना करण्यात आली. या आंदोलनात कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर, शाहू खैरे, डॉ. हेमलता पाटील, उद्धव पवार, सुरेश मारू, युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील आदी सहभागी झाले होते.
असे केले निषेधासन...
मराठा, धनगर आरक्षण, शेतकºयांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर अभ्यासासन, फसवी कर्जमाफी, शिवराय, डॉ. आंबेडकर स्मारकाविषयी घोषणासन किंवा गाजरासन; मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराची चौकशी न करता त्यांना क्लीन चिट दिल्याने क्लीनचिटासन; शेतकºयांविषयी अपशब्द काढणाºया मंत्र्यांच्या विरोधात वाचाळासन; महामार्ग कमी न केल्याच्या निषेधार्थ महागाईसन; रोजगार निर्मिती न केल्याच्या प्रश्नावर बेरोजगारासन; अंधभक्तांसाठी भक्तासन; सोशल माध्यमातील पेड ट्रोलाच्या विरोधात ट्रोलासन; खोटे आश्वासन दिल्याने फसवणीसासन; प्रत्येक प्रश्नावर दिल्या जाणाºया धमकीच्या निषेधार्थ धमकीआसन; दुष्काळप्रश्नी सदृश शब्द वापरल्याने अंशत:सन; राफेल प्रकरणात अंबानीला मदत केल्याने राफेलासन यावेळी करण्यात आले.