मंदी, महागाईच्या विरोधात कॉँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 12:49 AM2019-11-09T00:49:27+5:302019-11-09T00:49:50+5:30
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, आर्थिक मंदी, बॅँकांची दिवाळखोरी व वाढती महागाईच्या निषेधार्थ शुक्रवारी कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. देशातील आर्थिक परिस्थितीला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
नाशिक : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, आर्थिक मंदी, बॅँकांची दिवाळखोरी व वाढती महागाईच्या निषेधार्थ शुक्रवारी कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. देशातील आर्थिक परिस्थितीला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे व शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत सरकारच्या विरोधात फलक फडकवित जोरदार घोषणाबाजी केली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,