रखडलेल्या स्मार्टरोडच्या विरोधात कॉँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:21 AM2019-07-23T01:21:49+5:302019-07-23T01:22:06+5:30
स्मार्ट सिटी कंपनीने त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ यादरम्यान सुरू केलेल्या स्मार्टरोडचे काम दीड वर्षांपासून रखडले असून, त्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत कॉँग्रेसच्या वतीने सोमवारी (दि.२२) त्र्यंबकनाका सिग्नल येथे निदर्शने केली.
नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीने त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ यादरम्यान सुरू केलेल्या स्मार्टरोडचे काम दीड वर्षांपासून रखडले असून, त्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत कॉँग्रेसच्या वतीने सोमवारी (दि.२२) त्र्यंबकनाका सिग्नल येथे निदर्शने केली.
रस्त्यातून मलिदा काढण्याचा प्रयत्न स्मार्ट सिटी कंपनी करीत असून, वर्दळीच्या रखडलेल्या रस्त्याने व्यावसायिकांचे जगणे कठीण झाले आहे. शिवाय रस्ते बंद करण्यात आल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय झाली असून, सीबीएस, ठक्कर बाजार, त्र्यंबक नाका येथे वाहतूक कोंडी वाढली आहे. त्याच्या विरोधात ही निदर्शने कॉँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी अनिल बहोत, दर्शन पाटील, परवीन पठाण, मंजूषा गायकवाड, ज्योती खैरे, सचिन गिते, संगीता शिंदे , अश्विनी शिंदे, वैशाली केदार यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.