नाशिक : राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणा देत आलेल्या काही युवकांनी कॉँग्रेस कमिटीबाहेरील फलकावर असलेल्या फलकाला काळे फासल्याने कॉँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एम.जी. रोडवर ठिय्या मारून रास्ता रोको आंदोलन केले. अखेरीस नागरिकांची गैरसोय नको म्हणून पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर कॉँग्रेसच्या वतीने आंदोलन मागे घेण्यात आले.कॉँग्रेसचे स्थानिक नेते सोमवारी (दि.१६) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले होते. सावरकर यांनी माफी मागण्याबाबत ब्रिटिशांना पत्र लिहिले होते का ? त्याची खातरजमा करून केंद्र शासनानेच त्याबाबत खुलासा करावा. तसेच त्याबाबत भाजपवरच कारवाई करण्यात यावी, असे पत्र कॉँग्रेसच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. त्याचवेळी राहुल गांधी यांच्या कॉँग्रेस कमिटीबाहेरील फलकावरील प्रतिमेला काळी शाई उडाल्याचे त्यांना भ्रमणध्वनीवरून समजले. त्यामुळे कॉँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तातडीने कॉँग्रेस कमिटीकडे रवाना झाले. फलकावर शाई दिसताच कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, राजेंद्र बागुल, लक्ष्मण जायभावे, बबलू खैरे, सुरेश मारू, ज्ञानेश्वर काळे, आकाश घोलप, स्वप्नील पाटील यांनी तत्काळ एम. जी. रोडवर ठिय्या मारून रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि कॉँग्रेसच्या समर्थनार्थ घोषणा देत रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. अखेरीस पोलिसांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विनंती करीत बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.कठोर कारवाईची मागणीया प्रकरणी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भद्रकाली पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार नोंदवली आहे. कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या फलकावरील प्रतिमेवर शाई फासणाºया गुन्हेगारांचा शोध घेण्यात यावा, त्यासाठी वापरलेल्या राखाडी रंगाच्या इनोव्हा गाडीतील समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी कॉँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांद्वारे करण्यात आली आहे.
भाजपच्या निषेधार्थ कॉँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 1:29 AM