लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, शिवसेना, राष्टÑवादीच्या बैठकांपाठोपाठ भाजप व कॉँग्रेसच्या विखुरलेल्या सदस्यांचीही मंगळवारी एकत्रित बैठक होऊन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सर्वांनी एकजूट राखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी महाविकास आघाडीचे नेते नाशकात एकत्र येत असल्याने अध्यक्षपदाचा उमेदवार व विषय सभापतिपदाचे वाटप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (पान ५ वर)राष्टÑवादी कॉँग्रेस व शिवसेनेची बैठक घेण्यात आली असून, त्यात महाविकास आघाडीने अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला, तर सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांची बैठक होऊन त्यात भाजप व अन्य अपक्ष, माकपाच्या मदतीने निवडणूक लढविता येते काय, याची चाचपणी करण्यात आली.
जि.प.अध्यक्षपदासाठी कॉँग्रेसची पुन्हा एकजूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 12:01 AM
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, शिवसेना, राष्टÑवादीच्या ...
ठळक मुद्देउद्या ठरणार महाविकास आघाडीचा फॉर्म्युला