महागाई विरोधात येवल्यात काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 11:17 PM2021-07-19T23:17:02+5:302021-07-20T00:32:47+5:30

येवला : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅसचे वाढवलेले दर तसेच महागाईच्या विरोधात तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे स्वाक्षरी मोहिमेस शहरातील विंचूर चौफुली येथून सुरुवात करण्यात आली. काँग्रेसच्या या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Congress signature campaign in Yeola against inflation | महागाई विरोधात येवल्यात काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम

महागाई विरोधात येवल्यात काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम

Next
ठळक मुद्देकेंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड वाढवले आहेत.

येवला : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅसचे वाढवलेले दर तसेच महागाईच्या विरोधात तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे स्वाक्षरी मोहिमेस शहरातील विंचूर चौफुली येथून सुरुवात करण्यात आली. काँग्रेसच्या या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड वाढवले आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीसुद्धा वाढलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे अवघड झाले आहे. कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे आधीच जनता आर्थिक संकटात सापडलेली आहे. अशा परिस्थितीत वस्तूंच्या वाढलेल्या किमती कमी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे येवल्यात स्वाक्षरी मोहीम अभियान राबविण्यात येत असल्याचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. समीर देशमुख यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेस पक्षातर्फे शहरातील प्रत्येक गल्लीत तसेच तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन महागाईविरोधात तसेच केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, बळीराम शिंदे, नानासाहेब शिंदे, किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, भगवान चित्ते, कैलास घोडेराव, अण्णासाहेब पवार, युवक काँग्रेस अध्यक्ष मंगलसिंग परदेशी, अमित पटणी, बाबासाहेब शिंदे, मुसा शेख, मुकेश पाटोदकर, झेड. डब्ल्यू. ताडगे, शकील शेख, शिवाजी वाबळे, भगवान रसाळ, दीपक खोकले, विष्णू पवार, मच्छिंद्र मढवई, भाऊसाहेब गायकवाड, नामदेव कांगणे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title: Congress signature campaign in Yeola against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.