कॉँग्रेसचे पालिकेसमोर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 01:02 AM2020-09-12T01:02:39+5:302020-09-12T01:03:09+5:30

शॉपिंग सेंटरसाठी वापरण्यात येणारा निधी करंजवण पाणीपुरवठा योजनेसाठी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी कॉग्रेसच्या वतीने नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

Congress sit-in agitation in front of the municipality | कॉँग्रेसचे पालिकेसमोर ठिय्या आंदोलन

मनमाड पालिका कार्यालयासमोर ठिय्याा आंदोलनप्रसंगी उपस्थित कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अफजल शेख, रहेमान शहा, रविंद्र घोडेस्वार, संजय निकम, नाझिम शेख आदी.

Next
ठळक मुद्देमनमाड : करंजवण योजनेसाठी निधी वर्ग करण्याची मागणी

मनमाड : शॉपिंग सेंटरसाठी वापरण्यात येणारा निधी करंजवण पाणीपुरवठा योजनेसाठी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी कॉग्रेसच्या वतीने नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
नागरपरिषदेतर्फे चौदाव्या वित्त आयोगाचा ३ कोटी ९६ लाख रुपये निधी आययुडीपीतील शॉपिग सेंटरच्या बांधकामात वापरण्यात येत आहे. कॉग्रेस नगरसेवकांनी जनरल मिटींगमध्ये विरोध करून हा ठराव स्थगित करायला लावला होता. परंतु ते न करता जनतेची फसवणूक करून शॉपिग सेंटरचे बांधकाम सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. यातील दोन कोटी रुपये हे मनमाड शहरासाठीच्या करंजवन पाणीपुरवठा योजनेच्या निधीसाठी वर्ग करण्यात यावे अशी कॉग्रेस नगरसेवकाची मागणी असून त्यासाठी
कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष अफजल शेख यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर ठिया आंदोलन करण्यात आले. वंचीत बहुजन आघाडीचे राजेंद्र पगारे यांनी आंदोलनास पाठिंबा दिला आहे. यावेळी गटनेते रवींद्र घोडेस्वार , संतोष अहिरे,संजय निकम, सीमा निकम, मिलींद उबाळे, नाझीम
अफजल शेख, माजी नगराध्यक्ष रहेमान शहा, भीमराव जेजुरे,बाळासाहेब साळुंके, शशिकांत व्यवहारे, सुनील गवांदे उपस्थित होते.

Web Title: Congress sit-in agitation in front of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.