भारती पवार यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसची घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 01:30 AM2022-02-21T01:30:06+5:302022-02-21T01:30:35+5:30
कोरोना पसरण्यासाठी महाराष्ट्राला आणि मजुरांना जबाबदार ठरवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व भाजपने महाराष्ट्राची व स्थलांतरित मजुरांची माफी मागावी, या मागणीसाठी रविवारी (दि.२०) आंदोलनात्मक पवित्रा घेत काँग्रेस कमिटीपासून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या निवासस्थानाच्या दिशेने मोर्चा काढत निदर्शने केली. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना अशोकस्तंभ परिसरात रोखून ताब्यात घेतले. त्यामुळे भारती पवार यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेच्या नियोजनाप्रमाणे आंदोलन होऊ शकले नसले तरी काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रमुख हनिफ बशीर यांच्यासह काही कार्यकार्त्यांनी भारती पवार याचे निवासस्थान गाठून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपविरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन केले.
नाशिक : कोरोना पसरण्यासाठी महाराष्ट्राला आणि मजुरांना जबाबदार ठरवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व भाजपने महाराष्ट्राची व स्थलांतरित मजुरांची माफी मागावी, या मागणीसाठी रविवारी (दि.२०) आंदोलनात्मक पवित्रा घेत काँग्रेस कमिटीपासून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या निवासस्थानाच्या दिशेने मोर्चा काढत निदर्शने केली. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना अशोकस्तंभ परिसरात रोखून ताब्यात घेतले. त्यामुळे भारती पवार यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेच्या नियोजनाप्रमाणे आंदोलन होऊ शकले नसले तरी काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रमुख हनिफ बशीर यांच्यासह काही कार्यकार्त्यांनी भारती पवार याचे निवासस्थान गाठून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपविरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन केले.
नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे प्रभारी ब्रिज किशोर दत्त यांच्या उपस्थितीत रविवारी ( दि. २०) सकाळी काँग्रेस पक्षाच्या डिजिटल मेंबरशिपबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्याचप्रमाणे नाशिक महानगरपालिका निवडणुकीसंदर्भातही या बैठकीत चर्चेनंतर ब्रिज किशोर दत्त यांच्यासह काँग्रसेच्या माजी मंत्री शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद अहेर, नगरसेवक वत्सला खैरे, आशा तडवी, राहुल दिवे, सेवादल अध्यक्ष वसंत ठाकूर, अल्पसंख्याक शहराध्यक्ष हनिफ बशीर, युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, रशिदा शेख, बबलू खैरे, उषा बेंडकुळे, कैलास महाले, वंदना पाटील, शिराज कोकणी, नाना निकुंब, सुवर्णा गतकर आदींसह पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष, मनपा इच्छुक उमेदवार, काँग्रेस सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, अल्पसंख्याक विभाग, अनुसूचित जाती-जमाती विभाग, ओबीसी विभाग, असंघटित कामगार काँग्रेसच्या जवळपास ५० ते ६० आंदोलकांनी काँग्रेस कमिटी कार्यालयापासून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या निवासस्थानाच्या दिशेने मोर्चा काढला. हा मोर्चा अशोकस्तंभापर्यंत पोहोचत असतानाच पोलिसांनी आंदोलकांना रोखत त्याब्यात घेत सरकारवाडा पोलीस ठाण्यात नेले. मात्र, अल्पसंख्याक आघाडीचे प्रमुख हनिफ बशीर यांच्यासह काही कार्यकत्यांनी पोलिसांना चकवा देत डॉ. भारती पवार यांचे निवास स्थान गाठत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करीत भाजपने व पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील जनतेसोबतच स्थलांतरित मजुरांचीही माफी मागावी, अशी मागणी केली. दरम्यान, ही बाब लक्षात येताच पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाण्यात नेले.