नाशिकहून सुरतला जाणारे काँग्रेस कार्यकर्ते गुजरात पोलिसांच्या ताब्यात

By नामदेव भोर | Published: April 3, 2023 08:39 PM2023-04-03T20:39:40+5:302023-04-03T20:41:14+5:30

काँग्रेस नेते राहुल गांधींना पाठिंबा दर्शवण्यासाठी विविध राज्यांतील काँग्रेसच्या बड्या नेत्यांसह कार्यकर्ते सुरतच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Congress workers going to Surat from Nashik detained by Gujarat Police | नाशिकहून सुरतला जाणारे काँग्रेस कार्यकर्ते गुजरात पोलिसांच्या ताब्यात

नाशिकहून सुरतला जाणारे काँग्रेस कार्यकर्ते गुजरात पोलिसांच्या ताब्यात

googlenewsNext

नाशिक :काँग्रेसचे नेते राहुल गांधी मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांच्या शिक्षेविरोधात सुरत न्यायालयात अपील करण्यासोबतच जामिनासाठीही अर्ज दाखल करणार असल्याने त्यांच्या समर्थनार्थ नाशिकमधून सुरत येथे जात असलेल्या नाशिक शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांनी सोमवारी (दि.३) अटक केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधींना पाठिंबा दर्शवण्यासाठी विविध राज्यांतील काँग्रेसच्या बड्या नेत्यांसह कार्यकर्ते सुरतच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र, काही काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी रस्त्यात अडवून त्यांना अटकही केली आहे. त्यात नाशिकच्या काँग्रेस कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ जात असताना नाशिकच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी रस्त्यात अडवून त्यांना अटक करत धरमपूर पोलिस ठाणे वलसाड येथे ठेवण्यात आले आहे.

यामध्ये नाशिक शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील यांच्यासह पूर्व विधानसभा अध्यक्ष जावेद पठाण, मध्य विधानसभा अध्यक्ष जयेश सोनवणे, वकील सेल युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. कोनिक कोठारी, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय कोठुळे यांच्यासह नाशिक युवक काँग्रेसच्या आदी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Congress workers going to Surat from Nashik detained by Gujarat Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.