नोटबंदी निषेधार्थ कॉँग्रेसचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 01:12 AM2018-11-13T01:12:37+5:302018-11-13T01:13:00+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी केलेल्या नोटबंदीच्या निषेधार्थ शहर कॉँग्रेसच्या वतीने सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

 Congressional damn protest | नोटबंदी निषेधार्थ कॉँग्रेसचे धरणे

नोटबंदी निषेधार्थ कॉँग्रेसचे धरणे

Next

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी केलेल्या नोटबंदीच्या निषेधार्थ शहर कॉँग्रेसच्या वतीने सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी नोटबंदीच्या दुष्परिणामांचे फलक फडकविले. प्रदेश कॉँग्रेसने नोटबंदीच्या दुसºया वर्षपूर्तीनंतर ९ नोव्हेंबर रोजीच आंदोलनाची हाक दिली असली तरी, भाऊबीज असल्यामुळे आंदोलन दोन दिवस पुढे ढकलण्यात आले. दुपारी जिल्हाधिकाºयांना कॉँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करताना देशाची आर्थिक स्थिती, भ्रष्टाचार, आतंकवाद संपेल अशा वल्गना केली होती. प्रत्यक्षात नोटाबंदीमुळे देशाची आर्थिक स्थिती नाजूक झाली असून भ्रष्टाचार, आतंकवाद यामध्ये फरक पडलेला नाही. देशामध्ये १००पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. या आंदोलनात शहराध्यक्ष शरद आहेर, शाहू खैरे, हेमलता पाटील, वत्सला खैरे, वसंत ठाकूर, हनीफ बशीर, ज्युली डिसूझा, सुरेश मारू, स्वप्नील पाटील, नीलेश बबलू खैरे, उद्धव पवार, कैलास कडलग, पोपट हगवणे, लक्ष्मण जायभावे, राजेंद्र बागुल, गोपाल जगताप, अरुणा आहेर, वंदना पाटील, इसाक कुरेशी, समीना पठाण, आदी उपस्थित होते.

Web Title:  Congressional damn protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.