काँग्रेसचा मोदी सरकारविरोधात विश्वासघात मोर्चा, इंधन दरवाढीचा केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 01:36 PM2018-05-26T13:36:31+5:302018-05-26T13:36:31+5:30
केंद्रातील मोदी सरकारच्या कारकिर्दीला चार वर्षे पूर्ण झाले असून या चार वर्षात मोदी सरकाने जनतेचा विश्वास घात केल्याचा अरोप करीत नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी (दि.26)शहरातून मोर्चा काढूून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
नाशिक : केंद्रातील मोदी सरकारच्या कारकिर्दीला चार वर्षे पूर्ण झाले असून या चार वर्षात मोदी सरकाने जनतेचा विश्वास घात केल्याचा अरोप करीत नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी (दि.26)शहरातून मोर्चा काढूून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.परंतु चौथा शनिवारमुळे शासकीय कार्यालये बंद असल्याने तहसील दार अमित पवार यांनी आंदोलकांना सामोरे जाऊन काँग्रेच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदन स्विकारले.
केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार असून या सरकारने निव्वळ आश्वासने देऊन जनतेची फसवणूकच केल्याचा आरोप काँग्रेसने केला असून या सरकारच्या या फसवणुकी विरोधात व वाढत्या पेट्रोल डिङोल दरवाढीच्या निषेधार्थ शहर कॉँग्रेसच्या कार्यकत्र्यानी काळ्य़ा पटय़ा बांधून व काळ्य़ा रंगाचा पेहराव करून जिल्हाधिकारी कार्यालयार्पयत मोर्चा काढला. महिला नेत्या व कार्यकत्र्यानीही काळ्य़ा रंगाच्या साडय़ांमध्ये मोर्चात सहभाग घेतला. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यानी काँग्रेस कमिटीच्या कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयार्पयत चारचाकी वाहन ओढून व मोटरसायकलची अंत्ययात्र काढून पेट्रोल व डिङोल दरवाढीचा विरोध केला. यावेळी चार वर्षात मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याची टिका करताना सामान्य व्यक्तींचे जीवन जगणो या सरकारमुळे कठीण झाले असून, नुकत्याच इंधनाच्या दरात झालेली वाढ पाहता महागाईला आमंत्रण देण्यात आले आहे. सरकारने दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मोर्चा दरम्यान काँग्रेस कार्यकत्र्यानी भाजप सरकार विरोधी घोषणाबाजी करीत पेट्रोल व डिङोलची दरवाढ रद्ध करण्याची मागणी केली. यावेळी काँग्रेसचे विधान परिषद आमदार सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणो, शहराध्यक्ष शरद अहेर, माजीमंत्री शोभा बच्छाव, बबलू खैरे, वत्सला अखैरे, संजय तुपसाखरे, सिराज कोकणी, किशोर बाफना. रमेश पवार, बाळासाहेब गामणो, गुलाम शेख, सुरेश मारू, गोपाल जगताप आदि पदाधिकारी व कार्यकत्र्यानी मोर्चात सहभाग घेत सरकारविरोधात निषेध नोंदवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीने जनतेला अनेक फसवी अश्वासने देऊन सत्ता मिळविली. परंतु मोदींनी सत्तवर आल्यानंतर जनतेचा विश्वासघात केला असून वाढते, पेट्रोल व डिङोलचे भाव, महागाई, बलात्कार, अत्याचार व जाचीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे काँग्रेसने आज विश्वासघात मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध नोंदवला आहे. - सुधीर तांबे, आमदार, पदवीधर मतदारसंघ, नाशिक