कॉँग्रेसचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:25 AM2018-04-10T00:25:51+5:302018-04-10T00:25:51+5:30
मालेगाव : गोवंश हत्याबंदी, तिहेरी तलाक, अॅट्रॉसिटी अॅक्ट रद्द, मुस्लीम व दलित विरोधी निर्णय आदी केंद्र शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ मालेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ लाक्षणिक धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांना निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले.

देशात व राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर मुस्लीम व दलित समाजाच्या विरोधात निर्णय घेतले जात आहेत. गोवंश हत्याबंदी कायदा, तिहेरी तलाक, अॅट्रॉसिटी रद्द करणे आदी निर्णय घेण्यात आले. नोटबंदी, जीएसटी, इंधन दरवाढ यामुळे सर्वसामान्य जनतेवर अन्याय होत आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले होते.
या आंदोलनात महापौर रशीद शेख, शांताराम लाठर, सलिम अन्वर, पप्पू अलाउन्सर, फकीरा शेख, जब्बार ठेकेदार, जमालभाई सायकलवाले, इब्राहीम दादामिया, निहाल हाजी, एकबाल, रफीक खजुरवाले, शब्बीरभाइ सहभागी झाले होते.देशात व राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर गोवंश हत्याबंदी कायदा, तिहेरी तलाक, अॅट्रॉसिटी रद्द करणे आदी निर्णय घेण्यात आले. नोटबंदी, जीएसटी, इंधन दरवाढ यामुळे सर्वसामान्य जनतेवर अन्याय होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.