नाशिक : कठुआ व उन्नाव येथे झालेल्या महिला व बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शहर महिला कॉँग्रेसच्या वतीने शहरातून ‘कॅण्डल मार्च’ काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेला हा मोर्चा शिवाजी रोडवरील इंदिरा गांधी पुतळ्याजवळ विसर्जित करण्यात आला. यावेळी भाजपा सरकारच्या काळातच महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप कॉँग्रेसने केला.सायंकाळी ७ वाजता कॉँग्रेस भवनापासून हातात पेटत्या मेणबत्त्या व तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून कॅण्डल मार्च निघाला. मेहेर, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, टिळकपथ, सांगली बॅँक कॉर्नरमार्गे शालिमार चौकातील स्व. इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर मोर्चा विसर्जित करण्यात आला. मोर्चेकऱ्यांच्या हातात ‘स्टॉप रेप’ ‘नही सहेंगे बेटी पर वार, बंद करो अत्याचार’ असे विविध घोषणा लिहिलेले फलक होते.यावेळी बोलताना महिला अध्यक्ष वत्सला खैरे यांनी केंद्र सरकार बेटी बचाओ, बेटी पढाओ अशा घोषणा देत आहे, मात्र भाजपाच्या काळातच महिलांवर सर्वाधिक हल्ले, बलात्कार व अत्याचार होत असल्याचे सांगितले, तर शहराध्यक्ष शरद अहेर यांनी, केंद्र सरकार महिलांना सुरक्षा पुरविण्यास असमर्थ ठरल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे सांगितले.यावेळी डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, शाहू खैरे, अश्विनी बोरस्ते, आशा तडवी, ज्युली डिसूझा, मीना पटेल, ममता पाटील, डॉ. सूचिता बच्छाव, हनिफ बशीर, उद्धव पवार, बबलू खैरे, रईस शेख, किशोर बाफणा, सचिन दीक्षित, गोपाल जगताप, संतोष ठाकूर, वंदना पाटील, विजय पाटील आदी सहभागी झाले होते.
महिला अत्याचाराच्या निषेधार्थ कॉँग्रेसचा ‘कॅण्डल मार्च’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:10 PM
नाशिक : कठुआ व उन्नाव येथे झालेल्या महिला व बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शहर महिला कॉँग्रेसच्या वतीने शहरातून ‘कॅण्डल मार्च’ काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेला हा मोर्चा शिवाजी रोडवरील इंदिरा गांधी पुतळ्याजवळ विसर्जित करण्यात आला. यावेळी भाजपा सरकारच्या काळातच महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप कॉँग्रेसने केला.
ठळक मुद्देतोंडाला काळ्या पट्ट्या बांधून कॅण्डल मार्च निघाला