शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

हवाई मार्गे दिल्ली गोव्यासह नाशिक सात शहरांना जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 9:55 PM

नाशिकहून दिल्ली, गोवा, अहमदाबाद, बंगळूरू, भोपाळ, दिल्ली, हिडान (गाझियाबाद) तसेच हैदराबाद या सात ठिकाणी विमानसेवा निश्चित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देउडानचा दुसरा टप्पा लवकरच अन्य कंपन्यांच्या विमानसेवा सुरू होणारनाशिकमधून सात मार्ग निश्चित

नाशिक : अनेक वर्षांपासून विमानसेवेसाठी प्रतीक्षा करणाºया नाशिककरांसाठी केंद्र सरकारची उडान योजना भरून पावली आहे. मुंबई आणि पुण्यापाठोपाठ आता आणखी सात ठिकाणी नाशिकहून विमानसेवा सुरू होणार आहे. त्यानुसार दिल्ली आणि गोव्यासह सात ठिकाणी नाशिक जोडले जाणार आहे. त्यासाठी विविध चार कंपन्यांनी बीड केले असून, लवकरच ही सेवा सुरू होणार आहे.केंद्र सरकारच्या उडान योजनेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होत असून, त्यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांनी देशभरातील विविध सेवांचे टप्पे निश्चित केले आहेत. त्याअंतर्गत नाशिकमधून सात मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. नाशिकहून दिल्ली, गोवा, अहमदाबाद, बंगळूरू, भोपाळ, दिल्ली, हिडान (गाझियाबाद) तसेच हैदराबाद या सात ठिकाणी विमानसेवा निश्चित करण्यात आली आहे. या सेवेसाठी एअर इंडियाची एअर लाईन्स, स्पाईस जेट, इंडिगो, ट्रस्ट, जेट एअरवेज या पाच कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात या सर्व मार्गांवर काही प्रमाणात किफायतशीर दरात प्रवासाची संधी मिळणार आहे.गेल्यावर्षी उडानचा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर नाशिककरांची प्रतीक्षा संपली आणि पॅसेंजर टर्मिनल बांधून बंद असलेल्या ओझर येथील विमानतळावरून विमानसेवेला मुहूर्त लागला. मुंबई विमानतळावरून स्लॉट मिळाल्याने जून- जुलैमध्ये रखडलेली ही सेवा अखेरीस २३ डिसेंबर रोजी सुरू झाली. नाशिकहून मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी ही सेवा सध्या सुरू असली तरी मुंबईपेक्षा पुण्याच्या सेवेला अधिक प्रतिसाद मिळत आहे. याच दरम्यान उडानच्या दुसºया टप्प्याची तयारी सुरू झाली होती. नाशिकमधून कोणत्या शहरांना जाण्यास आवडेल यासंदर्भातील अनेक सर्व्हे नाशिकच्याच उद्योजक आणि व्यावसायिकांच्या संस्थेच्या माध्यमातून सुरू होते. त्यानुसार ही सेवा सुरू होणार असून, नाशिककरांची इच्छा पूर्ण होणार आहे. केवळ प्रवासच नव्हे तर नाशिकमधील उद्योग व्यावसायाला बुस्ट मिळणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकAirportविमानतळgoaगोवा