लासलगाव : गुंतवणूकदारांना व्याजाचे आमिष दाखवून १ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सिट्स चेक इन्स व रॉयल टिंकल स्टार कंपनी मुंबईचे (वडाळा) चेअरमन ओमप्रकाश गोयंका यास नाशिक ग्रामीण पोलीस आर्थिक गुन्हेशाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मुंबईत अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. मगरे यांनी येत्या ३० मेपर्यंत दहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.नाशिक, पुणे, मुंबई असे महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आदी राज्यातील सुमारे १८ लाख ठेवीदारांकडून या कंपनीने आर्थिक लाभाचे प्रलोभन दाखवून अंदाजे ४,५०० कोटींच्या ठेवी स्वीकारल्या आहेत. अंदाजे ७,५०० कोटी रुपये ठेवीदारांना देणे बाकी ठेवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. लासलगाव व परिसरातून तब्बल १०० कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्याचे समजते.सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी तपास केला. परंतु गुन्हा मोठ्या रकमेचा असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. नाशिकचे पोलीस अधीक्षक संजय दराडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक चंद्रहास देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी कारवाई केली.सिट्स चेक इन्स व रॉयल टिंकल स्टार या कंपनीचे चेअरमन गोयंका हे अनेक दिवसांपासून फरार होते.लासलगाव येथील अनिल गवळी, विजय भोर, रूपेश पांडे, पंकज सुर्वे, संतोष जगताप, संतोष खाडे, तसेच देवळा येथील दीपक पगार, डॉ. भूषण अहेर यांसह मोठ्या प्रमाणावर एजंटामार्फत गुंतवणूक केली गेली. या कंपनीने लासलगाव येथील कोटमगावरोडवर बॅँक आॅफ इंडियाच्या लासलगाव शाखेवर मोठी गुंतवणूक करून स्वमालकीचे कार्यालय उभारले आहे. या कार्यालयात वारंवार चकरा मारूनही रक्कम देण्यास टाळाटाळ केली आत असे. तसेच सध्या हे कार्यालय बंद आहे. गेले काही दिवस या फसवणूक प्रकरणी तक्र ारी करीत होते.याबाबत सिट्स चेक इन्स व रॉयल टिंकल स्टार या कंपनीचे चेअरमन ओमप्रकाश गोयंका व त्यांचे इतर सहकारी यांच्याविरुद्ध ठेवीदारांची सुमारे ९० लाख रु पयांची फसवणूक झाल्याची तक्र ार दाखल झालीहोती. तक्र ार करणाºयांची संख्या लासलगाव पोलीस ठाण्यात वाढत चालली असून, फसवणुकीचाआकडा एक कोटी ७० लाखांपेक्षा जास्त आहे.सुशिक्षित तरुणांना एजंटचे कामलासलगाव परिसरातील सुशिक्षित तरुणांना एजंटचे काम व मोठे कमिशन देऊन, तर गुंतवणूकदारांना काही वर्षांत गुंतवणूक केलेल्या रकमेवर घसघशीत परतावा मिळेल असे स्वप्नरंजन दाखवित गुंतवणुकीस आकर्षित केलेल्या सिट्स चेक इन्स व रॉयल टिंकल स्टार या कंपनीचे चेअरमन ओमप्रकाश गोयंका व त्यांच्या इतर सहकाºयांविरु द्ध ठेवीदारांची सुमारे ८० लाख रु पयांची फसवणूक केल्याची तक्र ार प्रथम लासलगाव येथील कविता अनिल पगार यांनी केली. त्यांनी पती अनिल पगारे यांच्या निधनानंतर मिळालेल्या १५ लाख रुपयांची यामध्ये गुंतवणूक केली. तसेच परिवाराची रक्कम विविध नावाने गुंतवणूक केली. परंतु ही रक्कम मिळाली नाही. इमू घोटाळा, केबीसीनंतर ढोकेश्वर प्रकरणी परिसरातल्या गुंतवणूकदारांना मोठ्या रकमेचे आमिष दाखविले. गुन्हा दाखल झाल्यानंतर फसवणूक होऊन लालची गुंतवणूक करणारे अडचणीत आले आहेत. टिंकल कंपनीने गुंतवणूकदारांची व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा, असे आमिष दाखवून मुंबईस्थित या चिटफंड कंपनीने राज्यात घोटाळा केला.
पावणेदोन कोटीच्या फसवणूक प्रकरणी संचालकास कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 1:26 AM
लासलगाव : गुंतवणूकदारांना व्याजाचे आमिष दाखवून १ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सिट्स चेक इन्स व रॉयल टिंकल स्टार कंपनी मुंबईचे (वडाळा) चेअरमन ओमप्रकाश गोयंका यास नाशिक ग्रामीण पोलीस आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मुंबईत अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. मगरे यांनी येत्या ३० मेपर्यंत दहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
ठळक मुद्देराज्यातील सुमारे १८ लाख ठेवीदारांकडून या कंपनीने आर्थिक लाभाचे प्रलोभन लासलगाव व परिसरातून तब्बल १०० कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्याचे समजते. सिट्स चेक इन्स, रॉयल टिंकल स्टार कंपनीच्या कार्यालयास कु लूप